Crime News esakal
छत्रपती संभाजीनगर

Crime News: नात्याला काळीमा फासणारी घटना; रागाच्या भरात पत्नीची दोरीने गळा आवळून हत्या; नातेवाइकांचा आरोप

हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस कऱ्हाळे येथील घटना

रुपेश नामदास

हिंगोली: भांडणानंतर रागाच्या भरात पत्नीच्या गळ्यावर जोराची लाथ मारली. त्यानंतर दोरीने गळा आवळून तिचा खून केल्याचा आरोप तिच्या माहेरकडील नातेवाइकांनी केला. तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथे रविवारी (ता. सात) ही घटना उघडकीस आली आहे. योगिता संतोष कऱ्हाळे (वय २८) असे मृताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी; वसमत तालुक्यातील सोन्ना येथील योगिता यांचा विवाह दहा वर्षांपूर्वी डिग्रस कऱ्हाळे येथील संतोष बळिराम कऱ्हाळे याच्यासोबत झाला होता. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे.

काही दिवसांपासून त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद होत होता. घटनेच्या दिवशी संतोष व त्याची पत्नी योगिता दोघेच घरी होते. संतोषचे वडील व आई घरी नव्हते. मध्यरात्री संतोष आणि योगिता यांच्यात शाब्दिक वाद झाला.

योगिताच्या माहेरकडील नातेवाइकांनी आरोप केला की, या वादातून संतोषने योगिता यांच्या गळ्यावर लाथ मारली. त्यामुळे त्या जमिनीवर कोसळल्या. त्यानंतर त्याने दोरीने योगिता यांचा गळा आवळून खून केला. रात्रभर तो मृतदेहाजवळच होता.

आज सकाळी त्याने सोन्ना येथे योगिता यांच्या माहेरी संपर्क साधून तिचा मृत्यू झाल्याची माहिती दिली, असेही तिच्या नातेवाइकांकडून सांगण्यात आले.

पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे, उपनिरीक्षक मगन पवार, जमादार विक्की कुंदनानी, शेख महमद, रामराव चिभडे, आकाश पंडितकर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा नोंद झालेला नव्हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन माझ्या बाळाचा बाप, महिलेनं दाखवले DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात नवा वाद

Satara News: 'सातारा जिल्हावासीय महादेवी हत्तीणीसाठी रस्त्यावर'; म्हसवडमध्ये जैन धर्मीयांचा मोर्चा, कऱ्हाडमध्ये स्वाक्षरी मोहीम

ED Action: पवार दाम्पत्याचा पाय अजून खोलात, ईडी अ‍ॅक्शन मोडमध्ये; 'या' दिवशी हजर राहण्याचे दिले आदेश

Agriculture News : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘सीसीआय’कडून कापसाला ८,१०० रुपयांचा भाव

Pune News: लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या तीर्थक्षेत्राच्या पायथ्याला कचऱ्याचा डोंगर, नागरिक आक्रमक

SCROLL FOR NEXT