छत्रपती संभाजीनगर

डिग्रस फाटा- लोहगाव रस्त्याचे डांबरीकरण

CD
ABD26J83140 हिंगोली ः डिग्रस फाटा ते लोहगाव रस्त्यावर एका बाजूने वेगाने सुरू असलेले डांबरीकरणाचे काम. डिग्रस फाटा ते लोहगाव रस्ताकामाला वेग हिंगोली, ता. १४ : तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे फाटा ते लोहगाव या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाला आता चांगलाच वेग आला असून, सध्या प्रत्यक्ष डांबरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. परिसरातील नागरिकांची अनेक दिवसांची मागणी लक्षात घेऊन आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून या रस्त्यासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या रस्त्याच्या पायाभरणीचे काम सुरू होते. आता प्रत्यक्ष डांबरीकरणास प्रारंभ झाल्याने परिसरातील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. हा रस्ता डिग्रस कऱ्हाळे परिसरासह जवळपास १० ते १५ गावांतील नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी तालुक्याच्या व जिल्ह्याच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. विशेष म्हणजे, शेगाव येथील संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे मार्गक्रमण करताना याच मार्गावरून जाते; त्यामुळे पालखी सोहळ्याच्या दृष्टीनेही या रस्त्याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाल्यानंतर परिसरातील वाहतूक अधिक गतिमान आणि सुरक्षित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime News : पैशांच्या वादातून रक्ताचा सडा! साडूनेच साडूचा केला निर्घृण खून अन् नंतर उचललं टोकाचं पाऊल; मिरज तालुक्यात खळबळ!

'संजय दत्तच्या केससाठी बाळासाहेबांनी मातोश्रीवर बोलावलं अन्...' उज्ज्वल निकम यांनी सांगितला किस्सा, म्हणाले...

Jellyfish in Anjarle Sea Beach : आंजर्ले समुद्रकिनारी जेलीफिशचा वावर वाढला; समुद्रात अंघोळ करताना १४ वर्षीय मुलीला स्पर्श, त्वचेवर खाज, जळजळ

Latest Marathi News Live Update: रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादीमध्ये वाद मिटेना, नेमकं काय घडतंय?

PM Modi: पंतप्रधान मोदींकडे डीके शिवकुमारांनी केली 'ही' मागणी; काँग्रेसमधूनच कडाडून विरोध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT