छत्रपती संभाजीनगर

हिंगोली जिल्हा भुकंपाच्या धक्क्यांनी पुन्हा हादरला

CD
ABD26J80641 कुपटी (ता. वसमत जि. हिंगोली) ः भूकंपाच्या धक्क्यांमुळे सुनील बर्गे यांच्या घरास गेलेले तडे. -------------- हिंगोली जिल्हा भूकंपाने पुन्हा हादरला --------------- -केंद्रबिंदू गडाळा (ता. औंढा), पांगरा शिंदे (ता. वसमत) येथे -अनेक घरांच्या भिंतींनाही तडे, नागरिक भीतीने घराबाहेर हिंगोली, ता. ३ (बातमीदार)ः भूकंपाच्या एकापाठोपाठ दोन धक्के व तीनवेळा भूगर्भातील आवाजाने शनिवारी (ता. तीन) सकाळी जिल्हा पुन्हा हादरला. सकाळी ७ः४७ वाजता बसलेल्या पहिल्या धक्क्याची नोंद ३.३ रिश्टर स्केल नोंदवली. केंद्रबिंदू गडाळा येथे (ता. औंढा नागनाथ) येथे तर दुसरा धक्का ९.४३ वाजता बसला त्याची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल एवढी होती तर केंद्रबिंदू पांगरा शिंदे परिसर (ता.वसमत) येथे असल्याचे समोर आले. यामुळे अनेक ठिकाणी घराच्या भिंतीना तडे गेले. आपत्कालीन यंत्रणा कडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कुठेही वित्त आणि किंवा जीवित हानी झाली नाही. मात्र नागरिकांत प्रचंड भीतीचे वातावरण आहे. हिंगोली जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत. गुरुवारी (ता.एक) रात्री ९.४१ वाजता वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात भूगर्भातून आवाजासह जमिनीस धक्का बसला होता. त्यानंतर शनिवारी (ता.तीन) ४८ तासांच्या आत दोन धक्क्यांनी जिल्हा हादरला. यावेळी भूगर्भातून भीषण गळगळात व खळखळाट असा आवाज आला. घरातील भांडी आणि इतर साहित्य हलल्याने घाबरलेल्या नागरिकांनी लहान मुले, वयोवृद्धांसह घराबाहेर पडत मोकळ्या मैदानात धाव घेतली. ------------------- ९ जुलैलाही एकाच दिवशी चार धक्के हिंगोली जिल्ह्यात नऊ जुलै रोजी पहाटे १.३७ ते ०३.२३ या दोन तासांत चार सौम्य धक्के जाणवले होते. एकाच दिवशी चार धक्के बसण्याची ती पहिलीच वेळ होती. या चार धक्क्यांची नोंद अनुक्रमे ४.६, ३.६, ३.९, ४.१ रिश्टर स्केल एवढी नोंदली गेली होती. त्यानंतर तीन ऑक्टोबर रोजी पुन्हा दोन धक्के बसले. ----------- जिल्हा प्रशासनाकडून आढावा भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेतला असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेसह संबंधित सर्व विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भूकंपाचे धक्के जाणवल्यास नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षित ठिकाणी जावे, इमारती, विद्युत खांब आणि इतर धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे. प्रशासनाकडून मिळणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. ------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: हॉकीत भारतच आशियाचा राजा! महिलांनंतर पुरुष संघानेही जिंकलं गोल्ड मेडल; ऑलिम्पिक तिकीटही पक्के

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

Dilip Walse Patil : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील लोणी-धामणी परिसरात दुष्काळाची तीव्रता जास्त; शासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु केली

Sandeep Kshirsagar: आजीच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आमदार क्षीरसागर जाणार नाहीत; 'त्या' व्यक्तीचं नाव पत्रिकेत येताच बीडचं राजकारण तापलं

Latest Marathi News Live Update : सर्पदंश प्रतिबंधासाठी राज्यात कृती आराखडा तयार करण्याचे नियोजन

SCROLL FOR NEXT