छत्रपती संभाजीनगर

विलगीकरणाची भिती, युवकाने कोविड सेंटरच्या इमारतीवरुन मारली उडी

जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना सेंटर येथे हिंगोली तालुक्यातील समगा येथील वैभव सरकटे या युवकाला नातेवाईकांनी उपचारासाठी दाखल केले.

सकाळ डिजिटल टीम

हिंगोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या (Hingoli District Hospital) कोविड (Corona) सेंटरमध्ये गुरुवारी (ता.१३) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास २८ वर्षाच्या युवकाने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून विलगीकरणाच्या भितीने उडी मारली. यात युवक जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना सेंटर येथे हिंगोली (Hingoli) तालुक्यातील समगा येथील वैभव सरकटे या युवकाला नातेवाईकांनी उपचारासाठी दाखल केले.(Hingoli Latest News Youth Jump From The Third Floor Of COvid Centre)

दरम्यान गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी यांनी कोविड रुग्णांना भेट देण्यासाठी आले होते. तेव्हा कोविड सेंटरमधील नातेवाईकांमध्ये एकच गोंधळ उडाल्याने काही स्वच्छतागृहात लपले, तर काही छतावर गेले. त्यातील वैभव सरकटे (रा. समगा) हा इमारतीवर गेला. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी रुग्णालयात प्रवेश करण्याअगोदरच आता आपल्याला विलगीकरण करतील या भितीने वैभवने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. यात तो जबर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: प्रयोग थांबणार अन् न्यूझीलंडविरुद्धच दिसणार भारताची World Cup ची संभावित प्लेइंग-११? कर्णधार शुभमन गिलचे संकेत

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

SCROLL FOR NEXT