छत्रपती संभाजीनगर

भाजीपाल्याला भाववाढीची फोडणी; आठवडाभरात भाव दुप्पटीवर!

CD
ABD26J82036 हिंगोली : शहरातील जवाहर रोड भागातील भाजीमंडईत विक्रीसाठी ठेवलेला भाजीपाला. ---- भाजीपाल्याला भाववाढीची फोडणी ---- अत्यल्प पावसामुळे उत्पादन घटले; मंडईत आवक मंदावली --- हिंगोली, ता. २४ : जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाल्याने भाजीपाला उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. पाण्याअभावी शेतातील भाजीपाला करपून जात असून, आठवडाभरात भाजीमंडईतील आवक निम्म्यावर आली आहे. परिणामी, भाजीपाल्याच्या दरांत वाढ झाली असून, शेवग्याच्या शेंगांचे दर प्रतिकिलो १५० ते १६० रुपयांवर पोचले आहेत. मिरची, टोमॅटो, सिमला मिरची, कारले आणि गाजराच्या दरांनीही शंभरी ओलांडली आहे. जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत अवघा ६९.९ टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत पावसात सुमारे ३० टक्क्यांची तूट निर्माण झाली आहे. याचा परिणाम भूजल पातळीवरही झाला असून, भूजल पातळीत २.८४ मीटरने घट नोंदविण्यात आली आहे. विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी खालावल्याने अनेक भागांत आतापासूनच पाणीटंचाईचे संकट जाणवू लागले आहे. कूपनलिका कोरड्या पडू लागल्याने हळद, कापूस आणि तूर या पिकांसह भाजीपाला उत्पादक शेतकरीही अडचणीत सापडले आहेत. एकीकडे पिके हातची जाण्याची भीती निर्माण झाली असताना दुसरीकडे भाजीपाला पिकालाही फटका बसू लागला आहे. पाण्याअभावी भाजीपाला शेतातच करपून जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. उत्पादनावर परिणाम झाल्याने मंडईत आवक मंदावली आहे. परिणामी, भाववाढीची फोडणी बसल्याचे चित्र आहे. ---- आवक घटल्याने दरवाढीचा ‘ठसका’ हिंगोली शहरातील जवाहर रोड परिसरातील मुख्य भाजीमंडईत गत महिन्याच्या तुलनेत सध्या भाजीपाल्याची आवक निम्म्यावर आली आहे. पाण्याअभावी भाजीपाला उत्पादन घटल्याने बाजारात मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडत आहे. परिणामी, आठवडाभरात अनेक भाज्यांचे दर जवळपास दुप्पट झाले आहेत. शेवग्याच्या शेंगांसाठी ग्राहकांना प्रतिकिलो १५० ते १६० रुपये मोजावे लागत आहेत. मिरची आणि टोमॅटोसह अन्य भाज्यांचे दरही वाढल्याने रोजच्या स्वयंपाकाचा खर्च वाढला आहे. ---- प्रतिक्रिया भाजीमंडईत पंधरा दिवसांपासून भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. त्यामुळे भाज्यांचे भाव वाढले आहेत. पाऊस नसल्याने शेतकऱ्यांकडून भाजीपाला विक्रीसाठी येत नाही. येणाऱ्या दिवसांतही आवक वाढण्याची शक्यता कमीच असून, आणखी भाववाढीची शक्यता आहे. - मुजीब बागवान, भाजी विक्रेता ----- प्रतिक्रिया यंदा अत्यल्प पावसामुळे खरिपाची पिके हातची गेली. सध्या विहीर, बोअरवर भाजीपाला जगविणेही शक्य होत नाही. एकीकडे पाण्याची कमतरता आणि दुसरीकडे प्रखर उन्हामुळे भाजीपाला शेतातच करपून जात आहे. - काशिराम कऱ्हाळे, भाजीपाला उत्पादक शेतकरी --- चौकट आठवडाभरात अशी झाली भाववाढ... भाजीचा प्रकार (प्रतिकिलो) - गत आठवड्यातील भाव - सध्याचा भाव टोमॅटो - ८० - १२० फुलकोबी - ७०- १०० पत्ताकोबी - ५० - ७० मिरची - १००- १२० गाजर - ५०- ८० गवार- ५० - ८० दोडके - ६० - ८० तुरई - ७० - ८० शेवगा - १२०- १६० वांगे - ५० - ८० शिमला मिरची - ७०- १२० कारले - ८० - १२० काकडी - ४०- ७० कोथिंबीर - ८० - १२० मेथी (प्रतिजुडी)- १५- ३० पालक (प्रतिजुडी)- १५- २०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Andhra Politics: भाचीच्या लग्नात मामाचाच खोडा; चंद्राबाबू नायडू कोणाला म्हणाले ‘कंसमामा’?

''पाकिस्तान आमचं संरक्षण करतोय, भारताकडून आता अपेक्षा नाही'', माजी मुख्यमंत्र्याच्या विधानानं खळबळ

Gold Jewellery Price: लग्नासाठी सोनं आत्ताच खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी? सोन्याचा भाव 1 लाखांपर्यंत येणार?

ड्रायव्हिंग लायसन्स काढणं होणार कठीण! ऑनलाइन परीक्षेत आता ७५% गुणांची अट, केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

VIRAT KOHLI: विराट कोहलीचा सराव सुरू, न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेचा थरार कधी रंगणार? जाणून घ्या ५ सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT