छत्रपती संभाजीनगर

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ''नो पास, नो एन्ट्री''; रूग्ण भेटीच्या वेळाही ठरल्या!

CD
ABD26J83358 हिंगोली : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय. जिल्हा रुग्णालयात ‘व्हिजिटर पास’ अनिवार्य - रुग्णांना भेटण्यासाठी निश्चित वेळांचे बंधन; अवाजवी गर्दी, संसर्ग रोखण्यासाठी निर्णय हिंगोली, ता. १८ ः येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (जीएमसी) दिवसेंदिवस वाढणारी गर्दी नियंत्रित करण्यासह रुग्णांना शांत, स्वच्छ आणि संसर्गमुक्त वातावरणात दर्जेदार उपचार मिळावेत, यासाठी रुग्णालय प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण व शिस्तप्रिय निर्णय घेतला आहे. आता रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना भेटण्यासाठी नातेवाईकांना निश्चित वेळेचे बंधन पाळावे लागणार असून, रुग्णालयात प्रवेशासाठी ‘व्हिजिटर पास’ सक्तीचा करण्यात येत आहे. याची कडक अंमलबजावणी १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे रुग्णालयातील बेशिस्तीला चाप बसणार असून वैद्यकीय सेवेला अधिक गती मिळणार आहे. हिंगोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वित झाल्यानंतर पूर्वीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कारभार सार्वजनिक आरोग्य विभागाकडून वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर गेल्या काही महिन्यांत रुग्णालयातील आरोग्य सुविधांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि आधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्री मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्याने उपचार व्यवस्थेला मोठे बळ मिळाले आहे. परिणामी, पूर्वी किरकोळ ते गंभीर आजारांच्या उपचारांसाठी रुग्णांना नांदेड, परभणी किंवा छत्रपती संभाजीनगर येथे धाव घ्यावी लागत होती, त्या ‘रेफर’ होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण आता मोठ्या प्रमाणावर घटले आहे. सध्या या रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) दररोज सरासरी ७०० ते ८०० रुग्ण विविध आजारांच्या तपासणी व उपचारांसाठी येत असून, गंभीर आजारांच्या शेकडो रुग्णांना विविध वॉर्डांमध्ये दाखल करून घेतले जात आहे. मात्र, रुग्णसेवेचा दर्जा सुधारत असतानाच रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांच्या अफाट गर्दीमुळे रुग्णालयाची अंतर्गत व्यवस्था कोलमडत असल्याचे चि चौकट सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी प्रणाली रुग्णालयात दाखल होणाऱ्या एका रुग्णासोबत तीन ते चार आणि काही वेळा तर चक्क आठ ते दहा नातेवाईक वॉर्डात ठाण मांडून बसत असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः अतिदक्षता विभाग (आयसीयू) आणि प्रसूती वॉर्डासारख्या अतिसंवेदनशील ठिकाणीही नातेवाईकांची रीघ लागत असल्याने ड्युटीवर असणाऱ्या डॉक्टरांना, परिचारिकांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना रुग्णांवर तातडीचे उपचार करताना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत होते. नातेवाईकांच्या या प्रचंड गर्दीमुळे वॉर्डांमधील स्वच्छता राखणे अशक्य होत असून, रुग्णांना विशेषतः नवजात बालके व शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना बाहेरील संसर्गाचा (इन्फेक्शन) मोठा धोका निर्माण होत होता. या सर्व बाबींची गंभीर दखल घेत रुग्णालयाची स्वच्छता, शांतता आणि सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने ही नवीन पास प्रणाली लागू केली आहे. चौकट १ डिसेंबरपासून अंमलबजावणी प्रशासनाने निश्चित केलेल्या नियमांनुसार, रुग्णांना भेटण्यासाठी दुपारी १ ते ३ आणि सायंकाळी ६ ते ७.३० अशी वेळ ठरवून देण्यात आली आहे. या वेळेव्यतिरिक्त इतर वेळी नातेवाईकांना वॉर्डात प्रवेश दिला जाणार नाही. रुग्ण प्रत्यक्ष रुग्णालयात दाखल होताना त्याच्यासोबत असणाऱ्या एकाच प्रमुख नातेवाईकाला अधिकृत ''व्हिजिटर पास'' दिला जाईल. केवळ गंभीर रुग्णांच्या बाबतीत वैद्यकीय निकष पाहून जास्तीत जास्त दोन नातेवाईकांना पास देण्याची विशेष व्यवस्था असेल. हा पास सोबत असणाऱ्या नातेवाईकालाच रुग्णाजवळ थांबण्याची परवानगी राहील. सुरक्षा रक्षकांमार्फत मुख्य प्रवेशद्वारावर आणि वॉर्डांच्या प्रवेशद्वारावर पासेसची काटेकोर तपासणी केली जाईल. एकाच वेळी अनेक नातेवाईकांनी रुग्णाजवळ गर्दी केल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. प्रतिक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णावर निर्भय, शांत आणि संसर्गमुक्त वातावरणात उपचार व्हावेत, हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. वॉर्डांमधील अनावश्यक गर्दीमुळे डॉक्टर व परिचारिकांचे कामावरील लक्ष विचलित होते आणि उपचारात अडथळा निर्माण होतो. गर्दीवर नियंत्रण, रुग्णालयातील स्वच्छता आणि संसर्ग प्रतिबंधासाठी ही ‘व्हिजिटर पास’ पद्धती लागू करण्यात येत आहे. नागरिकांनी आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी प्रशासनाच्या या नियमांचे काटेकोर पालन करून रुग्णसेवेत सहकार्य करावे. - डॉ. श्रीचक्रधर मुंगल, अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, हिंगोली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SMAT 2026: सूर्यकुमार यादव यावेळी मात्र फसला; ललित यादवच्या वादळी खेळीने मुंबईला रडवले, पण तरी हरला गोवा संघ!

Sona Mohapatra On Salman Khan : सैनिकांच्या बलिदानावरचा सिनेमा आणि 'दोन पेग'चं गाणं? सलमान खानवर सोना मोहापात्राचा संताप; म्हणाली, "कोणाच्या करिअरला..."

Latest Marathi News Live Update : मोर्शी नगरपरिषदेतील 'ओल्या पार्टी' प्रकरणी मोठी कारवाई

Success Story: आईने दागिने विकले, बापाने कर्ज काढलं; भावासाठी बहिणींनी शेतात केली मजुरी; लेकाने UPSC मध्ये मिळवली 239 वी रँक!

काँग्रेसचा अध्यक्ष, शिंदे सेनेचा उपाध्यक्ष; सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सर्वपक्षीय सत्ता

SCROLL FOR NEXT