छत्रपती संभाजीनगर

सिद्धेश्वरचा जिवंत पाणीसाठा २५ टक्क्यांवर; पाणीटंचाईचे संकट गडद

CD
पान १ लीड ---- ABD26J82078 हिंगोली ः शहराची तहान भागविणाऱ्या सिद्धेश्वर धरणातील पाणीसाठा. ------ हिंगोलीकरांच्या पाण्यात दहा मिनिटांची कात्री ---- चार दिवसांआड पुरवठा ः नगर परिषदेकडून शहरात पाणीकपात ------ हिंगोली, ता. २५ : शहराची तहान भागविणाऱ्या सिद्धेश्वर धरणातील उपयुक्त पाणीसाठ्यात दिवसेंदिवस झपाट्याने घट होत असून, रविवारी (ता. २५) सकाळी नोंदविण्यात आलेल्या आकडेवारीनुसार धरणात केवळ २५.८५ टक्केच जिवंत साठा शिल्लक राहिला आहे. धरणाची खालावलेली पाणीपातळी आणि येणारा प्रदीर्घ उन्हाळा लक्षात घेता नगर परिषद प्रशासनाने तातडीने शहराच्या पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात लागू केली आहे. शहरात आधीच चार दिवसांआड साधारणपणे एक तास पाणीपुरवठा केला जात होता; आता या १० टक्के कपातीमुळे नागरिकांना अवघ्या ५० मिनिटांवर समाधान मानावे लागत आहे. जिल्ह्यात यंदा पावसाने दगा दिल्याने धरणांसह साठवण व मध्यम, लघू प्रकल्पांमध्ये अपेक्षित जलसंचय होऊ शकलेला नाही. जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील मोजक्या पावसामुळे धरणात जमा झालेला तुटपुंजा साठाही आता संपण्याच्या मार्गावर आहे. भूजल पातळीत लक्षणीय घट झाल्याने परिसरातील विहिरींनी आत्ताच तळ गाठला असून, विंधन विहिरी हिवाळ्याच्या सुरवातीलाच कोरड्या पडू लागल्या आहेत. ऐन ऑक्टोबरमध्येच अशी बिकट परिस्थिती निर्माण झाल्याने आगामी उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचे संकट उभे ठाकणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. जिल्हा प्रशासनाकडून पाण्याचे आरक्षण निश्चित करण्याचे प्रयत्न सुरू असले, तरी मुळात पाणीसाठाच अत्यल्प असल्याने नियोजनाची मोठी कसरत करावी लागत आहे. ------- सिद्धेश्वर धरणात केवळ २५.८५ टक्के साठा पुढील पावसाळा सुरू होण्यासाठी अजूनही किमान आठ ते नऊ महिन्यांचा मोठा कालावधी बाकी आहे. अशा स्थितीत अवघ्या २५.८५ टक्के पाण्यावर संपूर्ण शहराची तहान कशी भागणार, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. न.प.ने पाणीकपात केली असली, तरी केवळ तेवढ्यावर न थांबता शहरातील अनधिकृत नळ जोडण्यांवर धडक मोहीम उघडावी, तसेच तोट्या नसलेल्या नळांमुळे रस्त्यावरून वाहून जाणाऱ्या पाण्याची नासाडी तातडीने थांबवावी, अशी संतप्त मागणी आता हिंगोलीकरांमधून जोर धरू लागली आहे. ---- येलदरीच्या पाण्याचा ताळेबंद जाहीर कधी होणार? जिल्ह्यातील येलदरी धरणात सध्या ५९.७३ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, या साठ्यावरील इतर पाणीपुरवठा योजनांचे आरक्षण, शेतीचे आवर्तन आणि प्रत्यक्ष सिद्धेश्वर धरणासाठी येलदरीतून किती व कधी पाणी सोडले जाणार, याबाबत प्रशासनाने अजूनही कोणताही अधिकृत ताळेबंद जाहीर केलेला नाही. त्यामुळे येलदरीत पाणी दिसत असले, तरी हिंगोलीकरांच्या हक्काचे पाणी नेमके किती, यावर अजूनही अनिश्‍चिततेचे सावट आहे. ----- नऊ जलकुंभांवर वितरणाचा ताण सिद्धेश्वर धरणातून उचललेले पाणी डिग्रस (कऱ्हाळे) येथील जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध करून ते शहरात उभारण्यात आलेल्या नऊ जलकुंभांद्वारे (पाण्याच्या टाक्या) विविध भागांत वितरीत केले जाते. वाढत्या शहराचा विस्तार लक्षात घेऊन न.प.ने जलकुंभांची संख्या वाढविल्याने वितरण व्यवस्था सुरळीत झाली खरी; मात्र आता प्रत्यक्ष धरणातच मुबलक पाणी शिल्लक नसल्याने या सर्व जलकुंभांवर पाणी वितरणाचा प्रचंड ताण निर्माण झाला आहे. ----- पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन संभाव्य भीषण टंचाई पाहता नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. घरगुती कामांसाठी पाण्याचा अपव्यय टाळावा, नळ उघडे सोडून पाणी वाया घालवू नये, तसेच जलवाहिन्या किंवा नळांना गळती असल्यास ती त्वरित दुरुस्त करावी. नागरिकांनी वाहने धुणे किंवा अंगणात पाणी मारणे यांसारखे प्रकार टाळून शक्य तिथे सांडपाण्याचा पुनर्वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. ----- ((कोट)) संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन शहरात कुठेही पाण्याचा थेंबही वाया जाऊ नये, यासाठी पाणीपुरवठा विभागामार्फत युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत. मुख्य जलवाहिन्यांच्या गळती दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. नागरिकांनीही या संकटाच्या काळात जबाबदारी ओळखून नळांना तातडीने तोट्या बसवून घ्याव्यात आणि पाणी भरून झाल्यानंतर तोटी बंद करावी, जेणे करून पाण्याचा अपव्यय टळेल. - साहेब भुरके, अभियंता, पाणीपुरवठा विभाग, नगर परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: हरमनप्रीत-दीप्तीने रचला शतकांचा डाव! भारताने झिम्बाब्वेसमोर ठेवलं मोठं लक्ष्य, दुसऱ्या डावात थरार सुरू

Mohol Crime New: मोहोळमध्ये ८५ वर्षीय वृद्धेला गंडा; दूध देण्याचे आमिष दाखवून ५० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

Dilip Walse Patil: कर्जतमधील वृक्षतोडीचा भीमाशंकर अभयारण्याशी संबंध नाही; दिलीप वळसे पाटलांचे स्पष्टीकरण

Solapur Crime: मेहुणीला शिक्षणासाठी घरी आणलं, पत्नी असताना तिच्यासोबत लग्न केलं अन्...; सासऱ्याने घडवला रक्तरंजित थरार

VIDEO : मल्लिकार्जुन खरगेंचं वादग्रस्त वक्तव्य; PM मोदींबद्दल बोलताच कार्यक्रमात गोंधळ, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून एकाला मारहाण, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT