history of 400 years Chhatrapati Sambhaji Nagar city has many historical structures Bibi-Ka-Maqbara Watermill Neher-e-Ambari Golden Palace
history of 400 years Chhatrapati Sambhaji Nagar city has many historical structures Bibi-Ka-Maqbara Watermill Neher-e-Ambari Golden Palace Sakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar : तब्बल ४०० वर्षांपूर्वी शहर होते ‘स्मार्ट’!

माधव इतबारे

छत्रपती संभाजीनगर : सुमारे ४०० वर्षांचा इतिहास असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरातील बीबी-का-मकबरा, पाणचक्की, नहर-ए-अंबरी, सोनेरी महलासह अनेक ऐतिहासिक वास्तू आजही आकर्षणाचे केंद्र आहेत. वास्तुकला व स्थापत्यशास्त्राचा या वास्तूंमध्ये अनोखा संगम असून, जगाच्या पाठीवर अशा वास्तू दुर्मिळच आहेत.

अनेक महलांमध्ये एसीचा वापर न करता उन्हाळ्यात थंड हवा मिळते तर हिवाळ्यात थंडी जाणवत नाही. ५२ दरवाजांना जोडणारी तटबंदी, विजेचा वापर न करता नहरींमधून शहरात येणारे पाणी, त्याकाळचे बगीचे, त्यातील कारंजे हे सारे काही अभूतपूर्वच. म्हणूनच छत्रपती संभाजीनगर म्हणजे खऱ्या अर्थाने चार शतकांपूर्वीचे ‘स्मार्ट सिटी’च होय. राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त शहरातील स्थापत्यकलेच्या वारशाला दिलेला हा उजाळा.

छत्रपती संभाजीनगर शहराला सातवाहन काळापासूनचा इतिहास आहे. विक्रमादित्य राजाच्या काळातही या परिसराचा उल्लेख आढळून येतो. देवगिरीच्या महान हिंदू साम्राज्याचे सम्राट राजे कृष्णदेवराय यांच्या वंशजांचे यादवांचे राज्य होते.

त्याकाळात देवगिरी प्रांतात मोठी भरभराट होती, असे दाखले मिळतात. इतिहासकारांच्या मते, १६०४ मध्ये अहमदनगरचा निजामशहा मूर्तझा द्वितीय याचा मंत्री मलिक अंबर याने हे शहर वसवले. १७०७ नंतर शहराचा ताबा हैदराबादच्या निजाम राजवटीकडे आला.

त्यामुळे या राजवटीतील म्हणजेच चार शतकातील प्रत्येक वास्तुकलेचा एकतरी नमुना छत्रपती संभाजीनगरात पहायला मिळतो. शहरातील ऐतिहासिक वास्तुकलेबाबत इंटॅक्टचे समन्वयक तथा आर्किटेक्ट अजय कुलकर्णी यांनी सांगितले, की वास्तुकला म्हणजे आर्किटेक्ट व स्थापत्यशास्त्र म्हणजे सिव्हिल.

हे दोन्ही शास्त्र वेगवेगळे असल्याचे मानले जाते; पण छत्रपती संभाजीनगर शहरातील ऐतिहासिक वास्तूंचा अभ्यास केल्यास या दोन्ही शास्त्रांमध्ये फारच कमी अंतर सापडेल. एखादी वास्तू विकत घेताना त्यासाठी वापरण्यात आलेले बांधकामाचे साहित्य पाहायचे की, त्याचे सौंदर्य हे अनेकांना समजत नाही; पण छत्रपती संभाजीनगर शहरातील ऐतिहासिक वास्तूचा विचार केल्यास स्थापत्य आणि सौंदर्य या दोन्हींचा मिलाफ पहायला मिळतो.

अशा वास्तू जगात क्वचितच आढळून येतात. सातवाहन ते निजाम राजवट अशा प्रत्येक राजवटीची छाप येथील ऐतिहासिक वास्तूंवर आहे. आजकाल ३०, ४० वर्षातील बांधकाम जुने झाले म्हणून ते पाडून नव्याने बांधकाम केले जाते; पण या वास्तू ४०० वर्षांपासून मजबुतीने उभ्या आहेत.

सोनेरी महल, पैठणचा स्तंभ, बीबी-का-मकबरा, वेरूळ-अजिंठा लेणी, अनेक ऐतिहासिक दरवाजे यांची चमक-धमक आजही कायम आहे. आज आपण इमारत मजबूत करण्यासाठी पाया खोदतो. पण त्यावेळी वरच्या बाजूने काम करत लेण्यांचे काम करण्यात आले. त्या आजही टिकून आहेत, त्यातून त्याकाळच्या स्थापत्य शास्त्राचे महत्त्व कळते.

पर्यावरणपूरक इमारतींचा वारसा

वाढत्या प्रदूषणामुळे संपूर्ण जग आज चिंतेत आहे; पण छत्रपती संभाजीनगर शहरात ऐतिहासिक इमारतींचा विचार केला तर त्या खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक आहेत, असे अजय कुलकर्णी म्हणाले.

अनेक महालांची रचनाच अशी आहे की, उन्हाळ्यात या महालांमध्ये एसीचा वापर न करता थंड हवा मिळते तर हिवाळ्यात थंडीपासून बचाव होतो. या भागातील हवामानाचा विचार करून या वास्तू उभारण्यात आल्या आहेत, त्यावेळी करण्यात आलेला हा विचार जगाला मोलाचा संदेश देणारा आहे. आजच्या पिढीने त्यातून प्रेरणा घेतली पाहिजे.

शहराची तेव्हाची रचना पाहता हे खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट’ शहर होते. कोणतीही वीज न वापरता १४ किलोमीटरवरून हर्सूल सावंगीचे पाणी शहरात आणले. भूमिगत नहरींतून आजही पाणी खळाळते. ग्रॅव्हिटीने हे पाणी नागरी भागात वळविले गेले. मात्र, सध्याची पिढी पाणी आणण्यासाठी उताराकडील पैठणकडे गेली, त्यामुळे शहराला महागडे पाणी मिळते, इतिहासातून आपण शिकले पाहिजे होते.

- अजय कुलकर्णी, आर्किटेक्ट तथा इन्टॅकचे समन्वयक

स्थापत्यशास्त्रात गेल्या काही वर्षांत वास्तुशास्त्राचे महत्त्व वाढत आहे. प्रत्येक इमारत तयार करताना ती वास्तुशास्त्रानुसार झाली पाहिजे, असा प्रत्येकाचा कटाक्ष असतो. वास्तुशास्त्रानुसार घर, इमारत नसेल तर त्यात राहणाऱ्यांच्या जीवनावर अनिष्ट प्रभाव पडतो, असे मानतात.

इतिहासाचा विचार करता मूळ वाल्मीकीने लिहिलेल्या रामायणात नळ आणि नीळ या वानर सेनेतील दोघांना समुद्रातील रामसेतूचे शिल्पकार मानले जाते. त्यांनी पाण्यावर तरंगणाऱ्या दगडांचा शोध घेऊन सेतू बांधला. हे अभियंते असल्याचे सांगितले जाते.

- नागेश मूर्तिकार गुरुजी, वेदशास्त्रसंपन्न.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: बंगालमध्ये वाद पेटला, TMC-ISF समर्थकांमध्ये हाणामारी, भाजपचा आरोप- पराभवाच्या भीतीने हिंसाचार

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT