Hoardings that do not provide certificate will be unauthorized action taken against it  Sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhajinagar : मजबुती प्रमाणपत्र न देणारे होर्डिंग ठरणार अनधिकृत; आठ दिवसांत प्रमाणपत्र न दिल्यास पाडापाडी

मुंबईच्या घाटकोपर भागात महाकाय होर्डिंग पडून १४ जणांचा गेल्या आठवड्यात मृत्यू झाला होता.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शहरात ज्या इमारतीवर होर्डिंग्ज लागले आहेत, त्या इमारतींसह होर्डिंगचे आठ दिवसांत स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पाच दिवस उलटले तरी अद्याप संबंधित एजन्सींनी असे प्रमाणपत्र दाखल केलेले नाही.

दरम्यान, ज्या होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट (मजबुती प्रमाणपत्र) करून प्रमाणपत्र सादर केले जाणार नाही, असे होर्डिंग बेकायदा ठरवून ते पाडले जातील, असा इशारा महापालिकेने दिलेल्या नोटिशीत दिला आहे.

मुंबईच्या घाटकोपर भागात महाकाय होर्डिंग पडून १४ जणांचा गेल्या आठवड्यात मृत्यू झाला होता. या अपघातानंतर सरकारला जाग आली असून, होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट दोन आठवड्यात करण्याचे आदेश महापालिकांना देण्यात आले.

त्यानुसार छत्रपती संभाजीनगर महापालिकेने देखील होर्डिंगच्या एजन्सीधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. आतापर्यंत ४१० होर्डिंगसंदर्भात नोटिसा बजावण्यात आल्याचे मालमत्ताअधिकारी संजय चामले यांनी सांगितले.

प्रत्येक होर्डिंगचे आणि ज्या इमारतीवर होर्डिंग लावण्यात आले आहे त्या इमारतीचे महापालिकेने नियुक्त केलेल्या अभियंत्यांकडून स्ट्रक्चरल ऑडिट आठ दिवसांत सादर करावे, असे नोटिशीत नमूद करण्यात आले.

ज्या होर्डिंगचे अहवाल सादर केले जाणार नाहीत, असे होर्डिंग अनधिकृत ठरवून पाडून टाकले जातील. पाडापाडीच्या कारवाईचा खर्चदेखील संबधितांकडून वसूल करण्यात येईल; तसेच फौजदारी कारवाई करण्यात येईल, यापूर्वी आपणास मजबुती प्रमाणपत्र सादर करण्याची सूचना करण्यात आलेली होती. पण, त्याची दखल घेण्यात आलेली नाही, असेही नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Liquor Tragedy : धक्कादायक उलगडा! गावठी दारूचा एकच घोट कसा ठरतो मृत्यूचं कारण? आतली भयावह प्रक्रिया वाचा

Mukesh Ambani: 1 रुपयाही पगार नाही, तरी देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती! मुकेश अंबानींची कमाई नेमकी कशी होते?

RCB विरुद्ध घरच्या मैदानात फायनल! गुजरातचा प्लॅन काय, कसा खेळणार संघ? शुभमन गिलने केला खुलासा

मी सगळं सोडूनच गेलेलं... लग्नानंतर अभिनय करणार नव्हती मृणाल दुसानिस; बाळ झाल्यानंतर का बदलला निर्णय?

Latest Marathi Update Live: कांदा खरेदीत नवा अडथळा, निर्णय झाला तरी अंमलबजावणी रखडली

SCROLL FOR NEXT