Holi 2024 Sakal
छत्रपती संभाजीनगर

Holi 2024: रंगोत्सवात नको प्राण्यांना इजा,अशी घ्या काळजी

Holi 2024: होळीच्या रंगांमुळे श्वान, गायी, बैलांना विषबाधा, त्वचारोगाची शक्यता होऊ शकते

सकाळ डिजिटल टीम

holi 2024 taken care of Animals during holi colors

होळीच्या रंगात रंगून जा, पण पाळीव प्राण्यांच्या अंगावर रंग उडू देऊ नका. प्राणी हा मायेने अंग चाटून घेतो. धूलिवंदनाच्या रंगांमुळे यातून प्राण्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे रंगपंचमीच्या रंगांपासून आवडत्या प्राण्यांना दूर ठेवण्याचे आवाहन प्राणीमित्र संघटनांनी केले आहे.

रंगपंचमी सोमवारी (ता. २५) साजरी होत आहे. रंगपंचमीमध्ये तल्लीन होताना रस्त्यात दिसेल त्या प्राण्यांच्या अंगावरही रंग टाकण्याचे प्रकार अनेक जण करतात. घरातही पाळीव प्राण्यांना घरातील लोक किंवा लहान मुले त्यांच्या अंगावर रंग उडवतात. शहरामधील अनेक नागरिकांनी पाळीव जनावरे पाळलेली आहेत.

यात विशेषतः श्वान, मांजर, गाय, बैल, बकरी तसेच कबूतर किंवा अन्य पक्षी यांचा सामावेश असतो. स्वतः रंगात न्हाऊन निघताना दिसेल त्या प्राण्यांच्या अंगावर रंग टाकण्याचे काम अतिउत्साही व्यक्ती किंवा लहान मुलेही करतात.

मात्र रंगपंचमीच्या आनंदात आपण प्राण्यांवर अन्याय करतो, याबद्दल कुणी विचारही करत नाही. बहुतांश जनावरांना अंग चाटण्याची सवय असते. यामुळे प्राण्यांच्या शरीरात रंग जातो, परिणामी त्यांनी विषबाधा होण्याची किंवा भविष्यात त्वचारोग होण्याची शक्यता वाढते.

लहान मुले कुत्रा किंवा मांजरींच्या अंगावर पिचकारी मारतात. यात मांजरीच्या, श्वानाच्या कानात रंग गेल्यास त्यांच्या कानाला इजा होऊ शकते. सुका रंग नाकात गेल्यास त्यांना फुफ्फुसाचा आजारही होऊ शकतो. त्यामुळेच कुठल्याच प्राण्यांना रंग लागणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे.

  • चिमुकल्यांचे करा समुपदेशन

रंग खेळण्याचा उत्साह लहान मुलांमध्ये अधिक असतो. लहान मुले कुतुहलापोटी प्राण्यांच्या अंगावर रंग उडवतात. विशेषतः गल्लीत, परिसरात दिसेल त्या कुत्र्यांवर मुले रंग टाकतात. त्यामुळेच या लहान मुलांना घरातील मोठ्या मंडळींनी समुपदेशन करुन असे न करण्याबद्दल त्यांना सांगण्याची गरज आहे.

  • तत्काळ करा उपाययोजना

पाळीव प्राण्यांना चुकून रंग लागला तर, त्यांना तात्काळ शाम्पूने अंघोळ घालावी. तसेच रंगाचे प्रमाण अधिक असेल आणि त्याचा परिणाम प्राण्यांवर दिसत असेल तर तत्काळ खडकेश्वर येथील किंवा मनपाच्या पशु चिकित्सालयात प्राण्यांना घेवून जावे आणि डॉक्टरांकडून उपचार करुन घ्यावेत, असे आवाहन लाईफ केअर ऍनिमल वेल्फेअर असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.

रंग हे रसायनमिश्रीत असतात, हे रंग प्राण्यांना लागल्यास प्राणी चाटून घेण्याचा प्रयत्न करतो. रंग पोटात गेल्यास प्राण्यांना विषबाधा होण्याची शक्यता आहे. भविष्यात प्राण्यांना त्वचारोग होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे प्राण्यांना रंगांपासून दूर ठेवण्याची गरज आहे.

- जयेश शिंदे, सचिव, लाईफ केअर एनिमल असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT