छत्रपती संभाजीनगर

मराठा सेवा संघ

CD
फोटोसह ABD26J80648 हिंगोली ः मराठा सेवा संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रातील यशवंतांचा सत्कार करण्यात आला. -------------- मराठा सेवा संघातर्फे २५५ गुणवंतांचा सत्कार --------- हिंगोलीत विविध क्षेत्रातील मान्यवरांचाही गौरव हिंगोली, ता. ३ (बातमीदार)ः मराठा सेवा संघ व कक्षाद्वारा शहरातील प्रल्हादराव वाबळे उमरेकर विद्यार्थी वसतिगृहाच्या प्रांगणात समाजातील चौथी, सातवी, आठवी शिष्यवृत्ती पात्र, दहावी, बारावीतील गुणवंतांसह विविध व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेले विद्यार्थी, पदवी व पदव्युत्तर परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, संशोधक, कला, क्रीडा,सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, कृषी, समाज सेवा, उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २५५ गुणवंत-यशवंतांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव ढोकर पाटील होते तर प्रमुख पाहुणे आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी जि.प. उपाध्यक्ष अनिल पतंगे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे, शिवसेना संपर्कप्रमुख विनायकराव भिसे पाटील, माजी शिक्षणाधिकारी शिवाजी पवार, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे माजी उपाध्यक्ष सतीशराव देशमुख, सहायक आयुक्त तथा जिल्हा समाजकल्याण अधिकारी अमोल आंभोरे यांची उपस्थिती होते. विशेष सहकार्य करणारे डॉ. यशवंत पवार, डॉ. गोपाल कदम, डॉ. माधुरी संदीप शिंदे, डॉ. गजानन शिंदे, डॉ. संतोष सावळे, डॉ. अयोध्या जारे, डॉ. प्रशांत झाडे, डॉ. अमोल सोळंके, साधना उद्धव इंगोले, डॉ. विकास कल्याणकर, प्रकाश ठाकरे, गजाननराव टाले, चैतन्य चव्हाण, महेश राखुंडे, श्याम पडोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ, महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी विविध वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांची मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष पंडित अवचार यांनी केले, प्रास्ताविक जिल्हा सचिव राजकुमार वायचाळ यांनी तर आभार जिल्हा समन्वयक शिवराज सरनाईक यांनी मानले. कार्यक्रमासाठी खंडेराव सरनाईक, शिवाजीराव ढोकर पाटील, राजकुमार वायचाळ, पंडित अवचार, पंडित शिरसाट, एकनाथराव कऱ्हाळे, सुधाकर बल्लाळ, हरिभाऊ मुटकुळे, माधव जाधव, गणेश गरड, महेश राखुंडे, शिवराज सरनाईक, विकास कल्याणकर, गोपाल बोस, शिवशंकर डोलारे, उद्धव इंगोले, प्रकाश आंभोरे, अमोल खिल्लारी, साधना परसराम हेंबाडे आदींनी पुढाकार घेतला. ---------------------------- अवतीभवती हायटेकच्या शिवम पारटकरचे यश परभणी ः झिरोफाटा येथील हायटेक हायस्कुलच्या शिवम पारटकर याने तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत १७ वर्षाआतील गटात ४५ किलो वजन गटाचे सुवर्णपदक पटकावले. त्याला क्रीडाशिक्षक प्रदीप जाधव यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल त्याचे संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर चव्हाण, सचिव रत्नमाला भालेराव यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Administrative Reshuffle : प्रशासनात मोठा भूकंप! १५ IAS अधिकाऱ्यांसह ३८ बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; पाहा कोणाची कुठे झाली रवानगी?

IND vs WI, 3rd ODI: केएल राहुलचं क्लासिकल शतक! रोहित-ऋतुराजची अर्धशतकं; भारताने वेस्ट इंडिजसमोर उभा केला धावांचा डोंगर

Asian Games 2026: हॉकीत भारतच आशियाचा राजा! महिलांनंतर पुरुष संघानेही जिंकलं गोल्ड मेडल; ऑलिम्पिक तिकीटही पक्के

Latest Marathi News Live Update : आरोपी नीलेश आरते याला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

SCROLL FOR NEXT