Aurangabad Crime News esakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेत धक्कादायक घटना, तरुणाला दगडाने ठेचून गुप्तांग जाळले

औरंगाबाद शहरात सात दिवसांत दोन खून

सुषेन जाधव

औरंगाबाद : औरंगाबादेतील टीव्ही सेंटर परिसरात तरुणाच्या डोक्यात दगड घातला इतकेच नव्हे तर चक्क गुप्तांग जाळले आणि मृतदेह देखील जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सिद्धार्थ भगवान साळवे (वय 32, वर्षे रा. सिद्धार्थनगर, टीव्ही सेंटर) असे त्या मृताचे नाव आहे. ही घटना आज शुक्रवारी (ता.२१) सकाळी टीव्ही सेंटर परिसरातील व्यापारी संकुलाच्या पाठीमागे असलेल्या मैदानात उघडकीस आली. विशेष म्हणजे ६ दिवसांत खुनाची (Crime In Aurangabad) ही दुसरी घटना आहे. सिद्धार्थ हा रात्री सिडकोतील एका खासगी रुग्णालयात काम करत होता आणि दिवसा रंगकाम करत असे.(Horrible Incident Occured In Aurangabad, Youth Brutally Killed)

पोलिसांनी मृतदेह घाटीत नेला असून उत्तरीय तपासणी सुरू आहे. गुन्हा दाखल करावा यासाठी नातेवाईक सिडको पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. सिद्धार्थ हा विवाहित असून त्याला एक मुलगा आहे. दारू पाण्यावरून सिद्धार्थचा सतत पत्नीसोबत वाद व्हायचा, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. सिद्धार्थचे औरंगाबादेत (Aurangabad) कोणीही नातेवाईक नसून मूळ हिवरा (ता.जाफराबाद, जि. जालना) येथील कुटुंबियांना माहिती देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT