छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेत घोड्यांना झाला असा आजार, की ठार मारण्याचीच पाळी...

माधव इतबारे

औरंगाबाद : शहरातील कोकणवाडी भागात घोड्यांच्या तबेल्यातील दोन घोड्यांना ग्लॅडर आजार झाल्याचे निष्पन झाले. या दोन्ही घोड्यांना दया मरण देण्याचा निर्णय पशुसंवर्धन विभागाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार गुरुवारी (ता. 27) सकाळी त्यांना ठार करण्यात आले.

कोकणवाडी भागात जनार्धन तांबे यांचा घोड्याचा तबेला आहे. हे घोडे लग्न समारंभासाठी भाड्याने दिले जातात. या तबेल्यातील दोन घोड्यांना ग्लॅडर या जिवाणू जन्य आजाराची लागण झाली. हा आजार संसर्गजन्य आहे.

या घोड्यांची तपासणी पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टरांनी केली. हा गंभीर आजार असल्यामुळे पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. प्रशांत चौधरी, सहायक आयुक्त डॉ. डी एस कांबळे, वल्लभ जोशी, डॉ. राठोडकर, मनपाचे पशुसंवर्धन संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांची बैठक झाली. या बैठकीत दोन घोड्यांना दया मरण देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

आधीच कोरोना सारख्या आजारांनी पाचावर धारण बसली असतानाच घोड्यांना हा आजार झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे, इतर घोड्यांना या आजाराची लागण होऊ नये, म्हणून या घोड्यांना गुरुवारी (ता. 27) पडेगाव येथील महापालिकेच्या कत्तलखान्यात नेऊन इंजेक्शन देऊन ठार करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Government Scheme : लाडक्या बहिणींनो सावधान! योजनेच्या फॉर्मसाठी जास्तीचे पैसे देताय? सरकारने उचललं 'हे' मोठं पाऊल, सेवा केंद्रचालकांचे धाबे दणाणले

Raj Thackeray: जपानी तरुणीचा व्हिडीओ व्हायरल… राज ठाकरेंनी मोहन भागवतांना विचारला थेट प्रश्न!

Destination Wedding India: डेस्टिनेशन वेडिंग प्लॅन करताय? उदयपूरशिवाय निवडा हे 4 शानदार ठिकाण, होईल शाही लग्नाचे स्वप्न पूर्ण

हायवे बनवा किंवा टोल वसुली थांबवा! रस्त्याच्या दुरावस्थेमुळे मित्र गमावला, तरुणांचा टोल नाक्यावर गोळीबार; चिठ्ठीतून दिली धमकी

Narendra Modi cabinet meeting: मोठी बातमी! मोदी सरकार 'या' राज्याचे नाव बदलणार... कॅबिनेट बैठकीत घेणार महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT