छत्रपती संभाजीनगर

वसतिगृह प्रवेशाच्या पोर्टलवर तांत्रिक अडचणी ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा; विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ३० ऑक्टोबरपर्यंत मुदत

CD
वसतिगृह प्रवेशाच्या पोर्टलवर तांत्रिक अडचणी ----- ऑफलाइन अर्ज करण्याची सुविधा; विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ३० ऑक्टोबरपर्यंत मुदत -- सकाळ वृत्तसेवा लातूर, ता. १४ : राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा स्तरावर २०२३-२४ पासून शासकीय वसतिगृहे सुरू करण्यात आली आहेत. या वसतिगृह प्रवेशाच्या ऑनलाइन पोर्टलवर तांत्रिक अडचणी येत असल्याने, २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील रिक्त जागांसाठी पात्र विद्यार्थ्यांनी आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने ‘सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, लातूर’ येथे ३० ऑक्टोबरपर्यंत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये मुलांसाठी १०० विद्यार्थी क्षमतेचे आणि मुलींसाठी १०० विद्यार्थी क्षमतेचे अशी दोन शासकीय वसतिगृहे कार्यान्वित करण्यात आली असून, यामध्ये प्रवेशीत विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि शैक्षणिक साहित्याची संपूर्ण मोफत व्यवस्था केली जाते. या वसतिगृह प्रवेशाच्या ऑनलाइन पोर्टलवर तांत्रिक अडचणी येत असल्याने, २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील रिक्त जागांसाठी उपरोक्त अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, लातूर येथे सादर करावेत. ही योजना बारावीनंतरचे उच्च शिक्षण घेणाऱ्या (व्यावसायिक व बिगर व्यावसायिक) विद्यार्थ्यांसाठी असून, प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या आणि बारावीमध्ये ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना यासाठी अर्ज करता येईल. मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या अधिक माहितीसाठी गृहपाल वृषाली बडे (मोबाइल- ९०२८२६११८३) आणि मुलांच्या शासकीय वसतिगृहाच्या माहितीसाठी गृहपाल सुरज तिरुके (मोबाइल - ८३२९४४७४१०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक अभय अटकळ यांनी केले. --- याकडे द्या लक्ष... - वसतिगृह प्रवेश योजनेसाठी अर्ज करणारा विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य - सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र असणे आवश्यक - विद्यार्थ्याच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे. - ज्या संस्थेत प्रवेश घेतला आहे, त्या शहराचा तो विद्यार्थी स्थानिक रहिवासी नसावा. स्वयंम योजनेसाठीही ऑफलाइन अर्ज इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (भटक्या जाती ‘क’ वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या (व्यावसायिक व बिगर व्यावसायिक) वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी या शैक्षणिक वर्षाकरिता सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सुरू असून या योजनेच्या ऑनलाइन पोर्टलवर येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे योजनेचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. या योजनेअंतर्गत जिल्हाभरातील ६०० विद्यार्थ्यांना लाभ दिला जाणार असून, महसुली विभाग शहरातील व उर्वरित ‘क’ वर्ग महापालिका क्षेत्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन, निवास व निर्वाह भत्ता म्हणून ४३ हजार रुपये, जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्यांसाठी ३८ हजार रुपये विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्यात थेट वितरित करण्यात येणार आहे. तरी ३० ऑक्टोबरपर्यंत सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, लातूर येथे अर्ज जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तालुका स्तरावरील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक महाविद्यालयांतील प्रवेशीत विद्यार्थ्यांनी देखील या योजनांचे अर्ज भरावेत. अधिक माहितीसाठी निरीक्षक भगवान केंद्रे (मो. ९५६११०९०१८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अभय अटकळ यांनी केले. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meerut Blue Drum Murder : देशभरात गाजलेल्या 'निळा ड्रम' हत्याकांडाचा निकाल; मुस्कान रस्तोगी आणि प्रियकर साहिल शुक्लाला थेट फाशीची शिक्षा!

पांढऱ्या भिंती, बेड नाही, सोफा नाही; सुशांत सिंह राजपूतच्या घरात अशी राहतेय अदा शर्मा; म्हणते- ज्यांना बसायचंय त्यांनी...

Maharashtra Live News : राहुल गांधी लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर; राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची करणार पाहणी

Mohol Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी व चाऱ्यासाठी मोहोळ तालुका त्रासला; खंडाळी ग्रामस्थांचे उपोषण सुरू

ICC T20I Ranking: ईशान किशन-अभिषेक शर्माला टक्कर देणार श्रेयस अय्यर! क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप

SCROLL FOR NEXT