छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद जिल्हा दूध संघात यंदा १०० टक्के मतदान, कोण मारणार बाजी?

जिल्हा दूध संघ निवडणुकीत १०० टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : जिल्हा सहकारी दूध संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी शनिवारी (ता २२) मतदान झाले. एकूण सर्वच्या सर्व ३४६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत शंभर टक्के मतदान झाले असून सात जागांवरील उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले. सात जण आधीच बिनविरोध आले आहेत. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष आज होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे. त्यात औरंगाबादेतील जागेबाबत सर्वांची उत्सुकता ताणली आहे.

जिल्हा दूध संघासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अनेक प्रयत्न झाले.संघाचे मावळते अध्यक्ष व भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांच्यासह दिग्गज नेत्यांनी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी केलेले प्रयत्न काहीअंशी फोल ठरले. एकूण १४ पैकी सात जागांवरील संचालक पदासाठीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले. उर्वरित सात जागांसाठी निवडणूक शनिवारी झाली.

स्वतः आमदार हरिभाऊ बागडे यांनी निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्न केले पण त्यांनाच निवडणुकीला सामोरे जावे लागले. या जागांसाठी १५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. एका बाजूला सर्वपक्षीय एकता सहकार विकास पॅनेल व दुसऱ्या बाजूला राजमाता जिजाऊ दूध संघ बचाव पॅनेल यांच्यामध्ये उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रचारातून प्रयत्न केले गेले. सर्वपक्षीय एकता पॅनेलमध्ये सर्वच पक्षाचे नेते एकत्र आल्याने निवडणूक एकतर्फीच होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

या जागांसाठी झाले मतदान

औरंगाबाद सर्वसाधारण मतदारसंघातील एक, कन्नड सर्वसाधारण मतदारसंघात एक, फुलंब्री सर्वसाधारण मतदारसंघात एक, वैजापूर सर्वसाधारण मतदारसंघाच्या एक, महिला राखीव मतदारसंघाच्या दोन, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती (व्हीजेएनटी) मतदारसंघाच्या एका जागेचा समावेश होता.

असे झाले मतदान

  1. सकाळी १० वाजताः २१ टक्के

  2. दुपारी १२ वाजताः ७३ टक्के

  3. दुपारी २ वाजता : ९३ टक्के

  4. शेवटच्या टप्प्यात: १०० टक्के

या केंद्रावर एवढे मतदान

सहा केंद्रांपैकी औरंगाबाद केंद्रावर (६२), पैठण (३८), वैजापूर (५०), कन्नड (४६), सिल्लोड (५६), फुलंब्री मतदारसंघातून सर्व (९४) मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केले अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तुळशीराम भोजने यांनी दिली. रविवारी (ता. २३) निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संविधानात बसेल ते मिळेल, कुणाच्या ताटातलं देणार नाही; मराठा आरक्षणावर फडणवीसांची प्रतिक्रिया, जरांगे म्हणाले, ताटच उरणार नाही

सभ्य रहा, नीट कपडे परिधान करा! भाडेकरू मुलींना घरमालकाचा सल्ला, रूममध्ये लावला CCTV कॅमेरा

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

Sainik Takli MIDC protest : सैनिक टाकळी एमआयडीसीविरोधात शिरोळमध्ये राडा; प्रशासनाच्या कार्यालयाचे गेट तोडले, काचा फोडल्या, पोलिस कर्मचारी जखमी

Duleep Trophy 2026: हा, मुलगा कमाल आहे! वैभव सूर्यवंशीच्या सांगण्यावरून DRS घेतला अन् सामन्यात ट्विस्ट आला Video Viral

SCROLL FOR NEXT