सासरी गेलेल्या पतीला मारहाण
छत्रपती संभाजीनगर, ता. ३ : मुलाला आईची आठवण येत असल्याने त्याला घेऊन सासरी पत्नीकडे गेलेल्या पतीला पत्नी आणि सासरच्या मंडळींनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. यावेळी पत्नीने पतीच्या डोक्यात दगड मारून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना २ नोव्हेंबर रोजी दुपारी २ः३०च्या सुमारास नारेगाव परिसरात घडली. याप्रकरणी पत्नी, मेव्हणा, सासू आणि सासऱ्याविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख फिरोज शेख नसिमोद्दीन (वय २६, रा. कादरा कॉलनी, मिसारवाडी) असे जखमी पतीचे नाव आहे. फिरोज हे नारेगाव परिसरात फर्निचरचे दुकान चालवतात. त्यांची पत्नी सना पठाण ही माहेरी राहत असल्याने मुलगा आईची आठवण काढून रडत होता. त्यामुळे २ नोव्हेंबर रोजी दुपारी फिरोज मुलाला घेऊन पत्नीच्या माहेरी गेले होते. तिथे गेल्यानंतर पत्नी सनाने भांडणाला सुरवात केली. तिने फिरोज यांच्या डोक्यात दगड मारून जखमी केले. तर सासरे गुलाम पठाण व सासू सायरा पठाण व मेहुणा अरबाज गुलाम यांनी फिरोज यास मारहाण केली. याप्रकरणी चौघांविरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार अफरोज खान करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.