Crime News  sakal
छत्रपती संभाजीनगर

Crime News : लग्नाच्या 8 वर्षांनंतर म्हणाला, "माझे दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे! तू स्वतः मर नाहीतर मी मारुन टाकेन"

या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित नोकरदार विवाहितेने बेडरुममध्ये फॅनला गळफास घेतला.

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजीनगर : पतीचे अनैतिक संबंध पत्नीला माहिती झाल्यानंतर पतीने ‘माझे दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे, तू मला अडचण होत आहे, तू स्वतः मर नाहीतर मी मारुन टाकेन’ असे म्हणत पत्नीला बेदम मारहाण केली. तसेच सासरची मंडळीही या ना त्या कारणावरुन विवाहितेला त्रास देत असत.

या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित नोकरदार विवाहितेने बेडरुममध्ये फॅनला गळफास घेतला. ही घटना १३ मेरोजी जयभवानीनगर गल्ली क्र. ११ येथे घडली. याप्रकरणी मृत विवाहितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन विवाहितेचा पती, सासरा, सासू व जाऊ अशा पाच जणांविरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला.

आरोपी पती विनोद विश्वनाथ काळे, दीर विजय काळे, जाऊ नर्मदा विजय काळे, सासरे विश्वनाथ काळे आणि सासू सुमनबाई विश्वनाथ काळे (रा. सर्व जयभवानीनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत, तर शुभांगी विनोद काळे (२६) असे मृत विवाहितेचे नाव आहे. यासंदर्भात मृत शुभांगी हिच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची मुलगी शुभांगीचा विवाह २०१५ साली विनोद काळेसोबत झाला होता.

शुभांगी ही एकूलती एक मुलगी होती, त्यामुळे तिचा विवाह धुमधडाक्यात लावून दिला होता. लग्नानंतर शुभांगीला सुरवातीचे काही दिवस चांगले नांदविले, मात्र नंतर तिला सासरच्या मंडळींकडून त्रास होत होता. अनेकवेळा शुभांगी हिच्या माहेरच्या मंडळींनी बैठका घेऊन जावयासह त्याच्या आईवडिलांना समजावले होते. शुभांगी ही उच्च शिक्षित होती, ती शहरातील एका हॉस्पीटलध्ये नोकरी करत असे.

दरम्यान तिचा पती रात्री उशिरापर्यंत कोणाशी तरी बोलत असल्याने तिने पतीला ही बाब विचारली असता, त्याने तिला मारहाण केली. घटनेच्या एक दोन दिवस अगोदरही तिला बेदम मारले होते. या सर्व बाबी दोन्ही घरी माहिती होत्या.

अखेर ‘तीने’ स्वतःलाच संपविले

१० मे रोजी शुभांगीला पतीने मारहाण केली, ११ मेरोजीही मारहाणीनंतर शुभांगीने माहेरी जाऊन सांगितले होते. त्यानंतर तिच्या लहान भावाने भावजींकडे जाऊन समजूत घातली. १३ मेरोजी सकाळी दहा वाजता शुभांगीने वडीलांना फोन केला तेव्हा ती नैराश्यात होती, वडीलांनी तिची ख्याली खुशाली विचारली, तेव्हा तीने फोन ठेऊन दिला होता. त्याच दिवशी तासाभरानंतर ११ वाजता तीने बेडरुमध्ये फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सासरच्या पाचजणांविरोधात दाखल गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक दिलीप बचाटे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT