Crime News Sakal
छत्रपती संभाजीनगर

Crime : धक्कादायक! पतीकडून मारहाण तर दीराकडून व्हायचा विवाहितेचा विनयभंग; Video Viral करण्याची धमकी

हा प्रकार जर कोणाला सांगितला तर ठार मारुन टाकेन तसेच तुझे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करेन अशी धमकी दिली.

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजीनगर : पतीकडून पैशांसाठी पत्नीचा छळ होत असे तर दिराकडून वहिणीचा विनयभंग होत असे. हा प्रकार कोणाला सांगितल्यास ठार मारुन टाकण्यासह व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची दिराकडून धमकी मिळत असे. अखेर विवाहितेने या त्रासाला कंटाळून जवाहरनगर पोलिस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचार, पैसे मागणे आणि विनयभंगाची तक्रार नोंदवली.

याप्रकरणी पतीसह दीराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार २५ मे २०१८ पासून आजपर्यंत इंदिरानगर परिसरात घडत होती.

विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचा ३२ वर्षीय पती हा तिला नेहमीच ‘तुझ्या बापाने लग्नात काहीच साहित्य दिले नाही, तसेच मला दुकान टाकण्यासाठी माहेरहून ५० हजार रुपये घेऊन ये, असे म्हणत शारिरिक, मानसिक छळ करत असे. याशिवाय तिचा दीर हा विवाहितेशी लगट करत जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असे.

त्याने एक दिवस वहिनीला स्वतःकडे ओढत तिचा विनयभंग केला. तसेच तिला मारहाण करुन हा प्रकार जर कोणाला सांगितला तर ठार मारुन टाकेन तसेच तुझे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करेन अशी धमकी दिली.

विशेष म्हणजे पिडीतेने पतीला ‘तुमचा भाऊ वारंवार जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असल्याची तक्रार पतीकडे केली असता, पतीने चक्क ‘माझ्या भावाला काही बोलायचे नाही, तो जसे बोलते तसेच करायचे.’ असे सांगितले. अनेक वर्षे हा प्रकार सहन केल्यानंतर अखेर पिडीतेने पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरुन दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT