I am simple man not afraid of anyone Chandrakant Khaire kirit Somaiya aurangabad
I am simple man not afraid of anyone Chandrakant Khaire kirit Somaiya aurangabad  sakal
छत्रपती संभाजीनगर

मी साधा माणूस, कुणालाच घाबरत नाही...

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : मी साधा माणूस आहे, माझ्याकडे शेती, कारखाने, फार्महाऊस, बंगले काहीच नाही, त्यामुळे मी किरीट सोमय्याला घाबरण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. किरीट सोमय्याच मला घाबरतो, अशा शब्दांत खैरे यांनी सोमय्या यांची खिल्ली उडवली. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली सोमय्या विरोधात आंदोलन आणि क्रांतीचौक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. पोलिस स्टेशनमधून बाहेर पडताना खैरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी श्री. सोमय्या यांची टिंगल उडवली. तुम्ही सोमय्याला घाबरत नाही का? असा सवाल केला तेव्हा खैरे म्हणाले, सोमय्याच मला घाबरतो, मी त्याला ए किरीट अशी हाक मारत होतो.

विमानात मी त्याचा हात पकडून खेचले होते, लोकसभेत देखील त्याला मी शक्ती कपूर म्हणायचो, त्यामुळे मी नाही तर तोच मला घाबरतो, असा दावा खैरे यांनी केला. माझ्याजवळ संपत्ती नाही, कारखाने, फार्महाऊस, शेती काहीही नाही. मी साधा माणूस आहे, त्यामुळे कुणालाच घाबरत नाही. माझ्याकडे जे आहे तेच मी इतरांना देतो, अगदी खिशात शंभर रुपये असले तरी ते देऊन टाकतो, असे ते म्हणाले.

युती सरकारमध्ये मंत्री, दोन वेळा आमदार, तीनदा खासदार असून देखील तुम्ही काहीच कसे कमावले नाही? या गुगलीवरही खैरे यांनी` मी मतांची खंडणी मागितली, पण पैशाची खंडणी कधी आयुष्यात मागितली नाही, असेही खैरे म्हणाले. माजी महापौर नंदकुमार घोडेले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, उपजिल्हाप्रमुख आनंद तांदुळवाडीकर, पूर्वचे शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, पूर्वचे विधानसभा संघटक राजू वैद्य, गोपाळ कुलकर्णी, अशोक पटवर्धन, अनिल जैस्वाल, वीरभद्र गादगे आदींची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT