छत्रपती संभाजीनगर

"आयसीआयसीआय" च्या उमरगा बँक शाखेकडून कर्जमाफीला कोलदांडा !

CD
कर्जमाफीची यादीच नाही उपलब्ध आयसीआयसीआयच्या उमरगा शाखेकडून कोलदांडा? - - - उमरगा, ता. ५ (बातमीदार) : राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर तालुक्यातील इतर बँकांनी पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या याद्या शासनाकडे पाठवून निधी मंजूर करून घेतला आहे. मात्र, आयसीआयसीआय बँकेच्या उमरगा शाखेने गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पात्र शेतकऱ्यांचे प्रस्ताव शासनाकडे पाठवलेच नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. दरम्यान, या संदर्भात प्रा.डॉ. शौकत पटेल, संजय चालुक्य यांनी गुरुवारी (ता. तीन) बँक व्यवस्थापक शिवकुमार बिराजदार यांना धारेवर धरले. याबाबतची माहिती अशी, की मुळज येथील अल्पभूधारक शेतकरी सिद्राम शंकर कोळी हे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून बँकेत हेलपाटे मारत होते. २०१४-१५ मध्ये घेतलेले त्यांचे मूळ कर्ज व्याजासह आता सुमारे सात लाख रुपयांवर पोहोचले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील कर्जमाफी योजनेतही बँकेच्या दिरंगाईमुळे सिद्राम कोळी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते. आंदोलनाचा इशारा प्रा. शौकत पटेल आणि संजय चालुक्य यांनी बँकेत जाऊन शाखा व्यवस्थापक शिवकुमार बिराजदार यांना थेट जाब विचारला. ‘संपूर्ण तालुक्यातून बँकेने केवळ कदेर गावातील एकाच कर्जदाराचे नाव कसे पाठवले, तसेच केसीसी खातेदारांची यादी सूचना फलकावर का लावली नाही?’, असा सवाल संजय चालुक्य त्यांनी केला आहे. मात्र, शासनाला आमच्या वेबसाइटवरून झोनल ऑफिसद्वारे माहिती दिली जाते, असे उत्तर शाखा व्यवस्थापक बिराजदार दिल्याने बँकेत वातावरण तापले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रा. पटेल यांनी आमदार प्रवीण स्वामी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या विषयावर येत्या सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. दरम्यान, या बँकेने फलकावर कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादीच लावलेले नसल्याने शेतकरीही गाफील राहिले. .......................... ((कोट)) बँकेने पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या याद्या फलकावर प्रसिद्ध करणे बंधनकारक असताना आयसीआयसीआय बँकेच्या उमरगा शाखेने हलगर्जीपणा केला आहे. बँकेने पात्र शेतकऱ्यांचे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविले पाहिजे. बँकेने ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करून कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी बँकेत लावावी. अन्यथा, आंदोलन केले जाईल. - प्रा. शौकत पटेल .......................... ((कोट)) शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची यादी झोनल ऑफिसकडून शासनाकडे पाठविण्यात आलेली आहे. जवळपास तेरा हजार ६१९ शेतकऱ्यांची नावे आहेत. त्यात उमरगा, लोहारा तालुक्यातील ७९ शेतकरी आहेत. त्याची रीतसर यादी काढून पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्यास बँक कटिबद्ध आहे. - शिवकुमार बिराजदार, बँक व्यवस्थापक - -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission ला 10 महिने पूर्ण, सॅलरी-पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर काय झालं? जाणून घ्या लेटेस्ट अपडेट

IND vs AFG : जसप्रीत बुमराह 'फिट' न झाल्यास, कोण घेईल त्याची जागा? ३ जबरदस्त गोलंदाज शर्यतीत, एक तर जस्सी नसतानाच चमकतो...

MPSC पेपरफुटी प्रकरणात नरहरी झिरवाळांचे स्वीय सहाय्यक गणेश देवरे यांचा खुलासा; म्हणाले, ‘मी दोषी आढळल्यास...’

कुंभ, मीन अन् मेष राशीच्या लोकांची शनीच्या साडेसातीपासून सुटका कधी? जाणून घ्या टाइमलाइन

Marathi News Live Updates: भागलपूर आणि नौगछिया भागातील पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्र्याकडून हवाई पाहणी

SCROLL FOR NEXT