sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर शहरात हवे आयटी हब

विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची अपेक्षा

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शहरात अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत. असे असले तरीही इथला विद्यार्थी पुणे-मुंबई येथे रोजगारासाठी भटकंती करतो. येथे उद्योगासाठी मोठ्या सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे शहरात आयटी हब झाले तर मराठवाड्यातील तरुणांना मराठवाड्यातच रोजगार मिळेल, अशी अपेक्षा शहरातील विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी ‘सकाळ संवाद’ कार्यक्रमात शुक्रवारी (ता. ५) व्यक्त केली.

यावेळी आपले पक्षातील हेवेदावे बाजूला ठेवत या प्रतिनिधींनी एक सामाजिक भावना ठेवत दिलखुलास चर्चा केली. यात भाजपचे शिवाजी दांडगे, शिवाजी भिंगारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप विखे, रामेश्वर कदम, शिवसेनेचे सतीश बोरनारे, मारुती वराडे, अनिल करंगळे, अक्षय जायभाय, गणेश मस्के यांनी सहभाग घेतला. ते म्हणाले, शहरात महापालिकेने दर्जेदार मैदाने, एक दिवस आड पाण्याचे पाणी उपलब्ध करून द्यायला हवे.

शहरामध्ये विविध शैक्षणिक संस्था असल्या तरी येथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीचा अभाव दिसून येतो. त्यामुळे शहरामध्ये आयटी इंडस्ट्री व इतर उद्योगव्यवसाय यायला हवेत. जिल्ह्यामध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याची गरज आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

वाहतूक कोंडी सोडवावी

शहरवासीयांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. खास करून दर्ग्याकडून बीड बायपासकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही समस्या अधिक आहे. आकाशवाणी चौक, वाळूज, दौलताबाद रस्ता या ठिकाणीही ही समस्या आहे. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे असल्याचे या चर्चेतून समोर आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought Criteria : दुष्काळ निकषांची पडताळणी सुरू बारा ऑक्टोबरपूर्वी घोषणा शक्य

Gokul Election 2026 : 'गोकुळ'चं राजकारण तापलं! मंत्री मुश्रीफ, विनय कोरेंनी नियोजित दौरे रद्द करून गाठली मुंबई; नेत्यांची जोरात फिल्डिंग, राजकीय चर्चांना उधाण

Latest Marathi News Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, हवामान तज्ज्ञांच्या इशाऱ्यानंतर जोरदार पाऊस

Aaditya Thackeray Disha Salian case : आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ? दिशा सालियानचे वडील सतीश सालियान अब्रुनुकसानीची नोटीस घेऊन मातोश्रीवर जाणार

PM Kisan e-KYC : शेतकऱ्यांनो लक्ष द्या! 'पीएम किसान'साठी 31 ऑक्टोबरची मुदत; ई-केवायसी, भूमी अभिलेख नोंद पूर्ण करणे आवश्यक, ताबडतोब करा 'हे' काम

SCROLL FOR NEXT