पैठण (जि.औरंगाबाद) : नाथ मंदिर परिसरातील यात्रा मैदानावरील अनधिकृत गाळ्यांवर गुरुवारी जेसीबी चालविण्यात आला. 
छत्रपती संभाजीनगर

पैठणच्या यात्रा मैदानावरील ४४ अनधिकृत गाळे पाडले

चंद्रकांत तारु

पैठण (जि.औरंगाबाद) : येथील यात्रा मैदानावरील अनधिकृत बांधण्यात आलेले ४४ गाळे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (IAS Sunil Chavan) यांनी दिलेल्या आदेशानुसार नगर परिषद प्रशासनाने गुरुवारी (ता. २६) जमीनदोस्त करण्यात आले. तत्पूर्वी या गाळ्यात अतिक्रमण करुन व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांना २४ तासांच्या (Paithan) आत गाळे रिकामे करण्याची नोटीस दिली होती. यानंतर जेसीबी, पोकलेन मशिनरीच्या साहाय्याने गाळे पाडण्याची धडक कारवाई करण्यात आली. यावेळी चोख (Aurangabad) पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. गुरुवारी सकाळी अतिक्रमण केलेल्या गाळ्यांची तहसीलदार चंद्रकांत शेळके, मुख्याधिकारी संतोष आगळे, सहायक पोलिस अधीक्षक गोरख भामरे, पोलिस निरीक्षक किशोर पवार यांनी पाहणी केली. यानंतर प्रत्यक्ष गाळ्यांचे बांधकाम पाडण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली.

सदरील गाळ्यांचे बांधकाम महाराष्ट्र शासनाच्या जागेवर नगर परिषदेने नियमबाह्य केली असल्याची जनहित उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन २०१७ मध्ये न्यायालयाने अतिक्रमण बांधकाम पाडण्याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी कारवाई करावी. असे याचिका निकालात स्पष्ट केले होते. परंतु यानंतर ही गाळ्यांचे बांधकाम पाडण्यात न आल्याने याचिकाकर्ता यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे तक्रार केली असता या तक्रारीची गंभीर दखल घेऊन नगर परिषद मुख्याधिकारी यांना तातडीने गाळे बांधकाम पाडण्याचे आदेश जारी केले. त्यानुसार ४४ गाळे पाडण्यात आले आहे.

गाळे बांधकामाची पार्श्‍वभूमी

येथील नाथ मंदिर परिसरात आरक्षण क्र.२९ यात्रा मैदान या जागेवर ४४ गाळे बांधले होते. गाळ्यांचे बांधकाम भूखंड क्रमांक.१०५१, १०५३, १०५४, १०५६ व १०५७ या महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या जागेवर केले. याबाबत नगर परिषदेने परवानगी व ठराव न घेता गाळे बांधले होते. हे बांधकाम महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ५२, ५३ व ५४ मधील तरतुदीनुसार अनधिकृत ठरत असल्याचे याचिकेवरील सुनावणीच्या निकालात न्यायालयाने म्हटले होते. त्यामुळे या नियमांच्या आधारे गाळे बांधकाम पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी हा आदेश दिला.

गाळ्यातील दुकानदारांना नाही वाली

नगर परिषदेच्या आधिपत्याखालीच या गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले. ही बाब सर्वश्रुत आहे. गाळे बांधकाम होण्यापूर्वी नाथमंदिर परिसरातील या जागेवर हेच दुकानदार होते. त्या दुकानदारांकडूनच विशिष्ट रक्कम घेऊन बांधकाम करण्यात आले. आज मात्र हे गाळे बांधकाम करताना कुणी वालीच या गाळ्यातील दुकानदार नसल्याची बाब समोर आली आहे. यामुळे दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI 2nd ODI : वादाला निमित्त! OUT or NOT OUT? नमन धीरचा अफलातून झेल, पण विंडीजला तो नाही पटला... Video पाहून ठरवा

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरीवेल्ली प्रसाद पाच दिवस मुंबई दौऱ्यावर; बैठकांना सुरुवात

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT