छत्रपती संभाजीनगर

मानसपुरी शिवारात जुगारावर छापा; १५ जणांवर गुन्हा

CD
मानसपुरी शिवारात जुगारावर छापा; पंधरा जणांवर गुन्हा ---- सकाळ वृत्तसेवा नांदेड, ता. ९ : कंधार ते उस्माननगर मार्गावरील मौजे मानसपुरी शिवारात सुरू असलेल्या अवैध तिर्रट जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत १५ जणांविरुद्ध कंधार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार लाख तीन हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातील चार आरोपी फरार झाले आहेत. ७ नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना मानसपुरी शिवारातील मोकळ्या जागेत काही जण तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने घटनास्थळी छापा टाकला. यावेळी १५ जण जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन दुचाकी, सात मोबाईल, रोख ५४ हजार ५२० रुपये आणि जुगाराचे साहित्य असा एकूण चार लाख तीन हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी शेख नूर मोहम्मद, शेख रब्बानी, मरीबा वाघमारे, उत्तम गिरडे, महेंद्र कोल्हे, बालाजी गोवंदे, शिवाजी ससाणे, अरुण लोहकरे, देवीदास घोगरे, अनिश घोगरे आणि विजय कोकरे यांच्यासह एकूण १५ जणांविरुद्ध कंधार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. दरम्यान, दीपक खैरे, संग्राम मोरे, दादाराव जाधव आणि राजू इंगेवाड हे चार आरोपी फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. ही कारवाई अपर पोलिस अधीक्षक संदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक रवी वाहुळे, पोलिस उपनिरीक्षक महेश कोरे तसेच पथकातील श्रीराम दासरे, मनोज राठोड आणि सुधाकर देवकते यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Politics : "गोकुळचं दार मी उघडलं म्हणून..."; महायुतीच्या दोन बड्या मंत्र्यांवर सतेज पाटलांचा थेट प्रहार!

AI Hallucination: धक्कादायक! सरकारी आदेशातच चक्क सुप्रीम कोर्टाचे बनावट निकाल? मुंबई उच्च न्यायालयाने काय केले पाहा...

Diwali Bank Holiday: नोव्हेंबरमध्ये बँकांना सुट्ट्यांची मेजवानी! महाराष्ट्रासह 'या' ३ राज्यांत राहणार बंद; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Rocket Firecrackers Ban: दिवाळीच्या उत्साहावर नियमांचं बंधन! मुंबईत रॉकेट फटाक्यांवर बंदी; महापालिकेचा मोठा निर्णय

Maharashtra Live News: "उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनील तटकरेंनीच दादांचा घात केला"; रामदास कदमांच्या विधानामुळे महायुतीत खळबळ

SCROLL FOR NEXT