छत्रपती संभाजीनगर

जुगारांवर छापा; १५ जण ताब्यात

CD
जुगारांवर छापा; १५ जण ताब्यात --- दोन कारवायांत ४ लाख ९४ हजारांचा मुद्देमाल जप्त --- सकाळ वृत्तसेवा नांदेड, ता. १५ : जिल्ह्यात अवैध जुगार अड्ड्यांवर नांदेड ग्रामीण आणि सिंदखेड पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून १५ जणांना ताब्यात घेतले. या दोन्ही कारवायांत तीन दुचाकी, पाच मोबाइल, रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ४ लाख ९४ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार, जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांना वाजेगाव येथील वीटभट्टीजवळील मोकळ्या जागेत तिर्रट जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सोमवारी (ता. १४) पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत दहा जण पोलिसांच्या हाती लागले. त्यांच्याकडून तीन दुचाकी, पाच मोबाइल, २ हजार ६६० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ३ लाख २५ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. --- वडसा येथेही कारवाई दुसरी कारवाई माहूर तालुक्यातील वडसा येथे सिंदखेड पोलिसांनी केली. एका घरात ‘झन्नामन्ना’ जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत राजू उत्तम दुंपलवार (३८), निखिल दिलीपराव कोरडे (२९), शेख तौफिक शेख हाफीज (३४), बालाजी पावडे आणि श्रीकांत मुरली यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून तीन दुचाकी, ३ हजार ९८० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य असा एकूण एक लाख ६८ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सिंदखेड ठाण्यात गुन्हा नोंद केला. नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई पोलिस निरीक्षक उमाकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक कुसमे व पथकाने केली. तर सिंदखेड पोलिसांची कारवाई सहायक पोलिस निरीक्षक संतोष जोंधळे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक मुंढे व कर्मचाऱ्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manchar News : नातवाच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच आजीनेही सोडले प्राण; खानदेशी कुटुंबावर दुहेरी दुःखाचा आघात

Latest Marathi News Update : औसा तहसील कार्यालयावर महिलांचा मोर्चा; कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Pune News : मुरलीधर मोहोळ यांच्या ताफ्यात कार घालण्याचा प्रयत्न; दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल

Kannad News : शेतकऱ्यांमध्ये संभ्रम! कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीत २,५०५ शेतकरी पात्र

Pune Ganeshotsav : पुण्यात यंदा प्रथमच ‘राज्य सांस्कृतिक महोत्सव’; शनिवारवाड्यावर ढोल-ताशा, काव्य आणि लोककलेचा त्रिवेणी संगम

SCROLL FOR NEXT