छत्रपती संभाजीनगर

अवैध सावकारीविरोधात कठोर कारवाई करा जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड; १४ प्रकरणात झडतीची कार्यवाही, २ प्रकरणात गुन्हे दाखल

CD
जिल्ह्यातील अवैध सावकारीविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना लातूर, ता. ६ : अवैध सावकारी प्रकरणात छापे टाकल्यानंतर त्यामध्ये अवैध सावकारीशी संबंधित दस्तऐवज आढळल्यास संबंधित व्यक्तींवर त्वरित गुन्हे दाखल करावेत. सावकारीचा परवाना नसताना अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कार्यवाही करावी, यामध्ये कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी दिला. अवैध सावकारीबाबत प्राप्त तक्रारींचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था विष्णू पोतंगले यांच्यासह सर्व तालुक्यांचे सहायक निबंधक सहकारी संस्था उपस्थित होते. अवैध सावकारी विरोधात प्राप्त तक्रारींवर कार्यवाही करताना छापा टाकल्यानंतर तथ्य आढळल्यास तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावेत, अन्यथा संबंधित सहायक निबंधक यांच्या विरोधात कार्यवाही केली जाईल. यापुढे छापा कार्यवाहीचा तहसीलदार यांनी आढावा घ्यावा, तसेच आतापर्यंत टाकलेल्या छाप्यातील ज्या प्रकरणांमध्ये तथ्य आढळले आहे, अशा प्रकरणांमध्ये पुढील दोन दिवसांत गुन्हे दाखल केले जावेत आणि प्रलंबित असलेल्या तक्रारींवर तातडीने गतीने कार्यवाही पूर्ण करावी, अशा सूचना डॉ. बास्टेवाड यांनी दिल्या. तसेच पोलिसांनी या गुन्ह्यांचा तपास कालबद्धपणे करून पुढील कार्यवाही गतीने करावी, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! कर्मभूमी एक्स्प्रेसच्या ४ डब्यांना भीषण आग; प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढलं

Pune News: पुणे-पिंपरीत पाणीकपात, तरी पवना नदीतून पाणीचोरी! विहिरीत साठवून टँकरने विक्री; चार दिवसांचा अल्टिमेटम

IND U19 vs NEP U19 : आर्यवीर सेहवागच्या वादळी ७० धावा; लक्ष्यसोबत भारताला Asia Cup मध्ये मिळवून दिला विजय, आता पाकिस्तानला चोपणार...

Latest Marathi News Update : पुण्यात एमडी ड्रग्ज आणि तीन पिस्तुलांसह सात जणांना अटक

Elon Musk News: मस्क यांचे एकाच दिवसात 7.1 लाख कोटींचे नुकसान! कारण काय? आता जगातील सर्वात श्रीमंत कोण?

SCROLL FOR NEXT