amc aurangabad
amc aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

मोबाईल टॉवर बेकायदा अन् त्याला पाच लाखांचे जनरेटर

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद- शहर परिसराला बेकायदा मोबाईल टॉवरचा विळखा पडला आहे. त्यानंतरही महापालिकेला न जुमानता मोबाईल कंपन्यांतर्फे बेकायदा टॉवर उभारण्याचा सपाटा सुरूच आहे. भावसिंगपुरा परिसरातील साकेतनगर-पेठेनगर रस्त्यावर गेल्या सहा महिन्यांपासून अशाच प्रकारे टॉवर उभारणीचे काम सुरू होते. महापालिकेने नोटीस बजावल्यानंतरही याठिकाणी जनरेटर बसविण्यात आले होते.  सुमारे पाच लाख रुपये किमतीचे जनरेटर महापालिकेने क्रेनच्या साहाय्याने जप्त केले. 

शहरातील बेकायदा मोबाईल टॉवरचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून गाजत आहे. महापालिकेची परवानगी न घेता, ज्या इमारतीवर टॉवर उभारले जाते तेथील स्ट्रक्‍चरल ऑडिट न करता, टॉवर उभारण्यात आले आहेत. पाहता-पाहता बेकायदा टॉवरची संख्या पाचशेच्या वर गेली आहे. असे टॉवर महापालिकेच्या रेकॉर्डवर येईपर्यंत कुठलाही कर लागला जात नाही. त्यामुळे मोबाईल कंपन्यांचे फावते.

साकेतनगर-पेठेनगर रस्त्यावर गेल्या सहा महिन्यांपासून जाधव यांच्या इमारतीवर जिओ कंपनीतर्फे मोबाईल टॉवर उभारणीचे काम सुरू होते. नागरिकांच्या तक्रारीनंतर महापालिकेने संबंधितांना नोटीस बजावली. त्यानंतर सुटीच्या दिवशी किंवा रात्रीच्यावेळी काम सुरू करण्यात आले. महापालिकेच्या नोटिसीनंतरही टॉवरचे काम पूर्णत्वाकडे आले. याठिकाणी मोठे जनरेटरही लावण्यात आले. त्यामुळे नव्याने नागरिकांनी तक्रारी केल्या.

त्याची दखल घेत आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी बेकायदा टॉवरवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार अतिक्रमण हटाव विभागाचे पथक दुपारी साकेतनगर येथे पोचले. यावेळी क्रेनच्या मदतीने सुमारे 35 फूट उंचीवरील 600 किलो वजनाचे जनरेटर महापालिकेच्या पथकाने जप्त केले. त्यामुळे खळबळ उडाली आहे. उपायुक्त रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली इमारत निरीक्षक सय्यद जमशीद, रवींद्र देसाई, सहायक फौजदार शेख अमीन, महिला पोलिस श्रीमती म्हस्के, नागरिक मित्र पथकाचे सहाने, विद्युत विभागाचे मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 
 
तरीही महापालिकेचे अभयच 
शहराच्या अनेक भागांत महापालिका अधिकाऱ्याच्या आशीर्वादानेच बेकायदा कामे होतात, असा आरोप नगरसेवक, नागरिकांतर्फे वारंवार केला जातो. शुक्रवारी बेकायदा मोबाईल टॉवरवर कारवाई करण्यात आली; मात्र ज्यांच्या घरावर टॉवर उभारला जात होता, त्यांचे पूर्ण नाव लपविण्यात आले. संबंधित व्यक्ती सरकारी नोकरीला असल्याची चर्चा परिसरात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT