Sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : सिडकोत दोन ठिकाणी ‘स्पा’च्या नावाखाली कुंटणखाना ; तेरा पीडित मुलींची सुटका,दोघांवर कारवाई

एन-३ येथील रॉयल ओक स्पाच्या नावाखाली कुंटणखाना सुरू होता. पोलिसांनी सापळा रचून मंगळवारी (ता.३०) छापा मारला. यात १३ पीडित मुलींची सुटका करण्यात आली. या कारवाईत स्पाच्या व्यवस्थापक महिलेला ताब्यात घेतले.

सकाळ वृत्तसेवा

सिडको : एन-३ येथील रॉयल ओक स्पाच्या नावाखाली कुंटणखाना सुरू होता. पोलिसांनी सापळा रचून मंगळवारी (ता.३०) छापा मारला. यात १३ पीडित मुलींची सुटका करण्यात आली. या कारवाईत स्पाच्या व्यवस्थापक महिलेला ताब्यात घेतले.

पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून, रॉयल ओक स्पा येथे डमी ग्राहक पाठवून ग्राहकाच्या इशाऱ्यानुसार छापा टाकला असता सदर ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे दिसून आले. येथून पाच मुलींची सुटका करण्यात आली. रॉयल ओक स्पा येथील मॅनेजरकडे पोलिसांनी चौकशी केली असता तिने तशाच प्रकारचा व्यवसाय ‘अथर्व स्पा’ या ठिकाणीसुद्धा सुरू असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी ‘अथर्व स्पा’ येथे छापा टाकला असता आठ मुली व मॅनेजर असे आढळून आले. या कारवाईबाबत कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालू होती.

दरम्यान, या अगोदर सिडकोतील एका कोचिंग क्लासेसमध्ये व सातारा परिसरात एका राहत्या घरात कुंटणखाना चालू असल्याचा प्रकार समोर आला होता. यात एका विदेशी तरुणीची सुटका करण्यात आली होती, ही घटना ताजी असतानाच आता स्पा सेंटरमध्ये असे कृत्य आढळून येत असल्याने शहरात अशा ठिकाणांवर पोलिसांच्यावतीने कारवाईला वेग आलेला दिसून येत आहे.

सदरची कारवाई पोलिस आयुक्त मनोज लोहिया पोलिस, उपायुक्त नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त डॉ. रणजित पाटील, सातारा डीबी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक सुरेश जारवाल यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काम पाहिले. तर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : ५०० कोटींच्या प्रकरणाचा छडा लागेपर्यंत विषय संपवणार नाही; मनोज जरांगेंचा फडणवीस, शिंदेंना तपासाचे आव्हान

IND vs NZ 2nd T20: ६ चेंडूंत ११ धावा, शेवटच्या चेंडूपर्यंत थरार! तिलक-नितीशने पलटवला सामना, भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय!

Piyush Goyal : पावभाजीची चव रोबोट देऊ शकणार नाही; वैभव सूर्यवंशीसारखा सिक्सरही नाही! कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मर्यादा आणि भारतातील संशोधनाच्या संधींवर पियुष गोयल यांची मांडणी

Latest Marathi News Live Update : तर आम्ही आणखी मोठा बॉम्ब फोडणार! मनोज जरांगे पाटील आक्रमक

आधी सौंदर्यस्पर्धांवर बंदी, आता मृत्युदंडाची शिक्षा! बुर्किना फासोच्या निर्णयांची का आहे जगभरात चर्चा?

SCROLL FOR NEXT