अवैध वाळू उपशावर कारवाई
जेसीबी, दोन ट्रॅक्टरसह सात जणांवर गुन्हा
आष्टी, ता. १९ (बातमीदार) : तालुक्यातील वाकी शिवारातील सीना नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर आष्टी पोलिसांनी धडक कारवाई केली. मंगळवारी (ता. १७) पहाटे २.५० वाजता टाकलेल्या या छाप्यात पोलिसांनी एक जेसीबी आणि दोन ट्रॅक्टर-ट्रॉली असा एकूण ३३ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस उपअधीक्षक भारत पांढरे यांना वाकी येथील नदीपात्रात विनापरवाना वाळू उपसा आणि चोरटी वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने पंचांसह घटनास्थळी छापा टाकला. यावेळी जेसीबीच्या साहाय्याने वाळूचा उपसा सुरू होता, तर दोन ट्रॅक्टर-ट्रॉलींमध्ये वाळू भरलेली आढळून आली. पोलिसांची चाहूल लागताच काही जणांनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.
या कारवाईत पोलिसांनी १५ लाख रुपये किमतीचा जेसीबी, तसेच अनुक्रमे ८ लाख ५६ हजार आणि ९ लाख ५६ हजार रुपये किमतीच्या दोन ट्रॅक्टर-ट्रॉली ताब्यात घेतल्या आहेत. पोलीस अंमलदार नागेश लोमटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आकाश चक्रधर कोठे, पार्थ अनिल कोठे, विशाल विजय कोठे, अर्जुन दीपक रोकडे, आकाश सुभाष पाटील, समाधान ऊर्फ अजय ससाणे आणि यश नंदू कोठे यांच्याविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) व ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.