हायवा, टिप्पर, जेसीबीसह चार तराफे ताब्यात
------------
वझूरला गोदापात्रात वाळूचा अवैध उपसा; ७९ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त
गंगाखेड, ता. ३१ (बातमीदार) : पूर्णा तालुक्यातील वझूर शिवारातील गोदावरी नदीपात्रात विनापरवाना अवैध वाळू उत्खनन व वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच गंगाखेड पोलिसांनी शुक्रवारी (ता. ३०) मध्यरात्री छापा टाकला. या कारवाईत एकूण ७९ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शुक्रवारी (ता. ३०) रात्री सव्वाबाराच्या सुमारास वझूर शिवारातील गोदावरी नदीपात्रात शासनाची कोणतीही परवानगी न घेता वाळूचे उत्खनन व वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असता, एमएच २२ एए ५५५५ क्रमांकाचा हायवा (अंदाजे पाच ब्रास वाळूसह), एमएच १४ सीआर ०७७८ क्रमांकाचा टिप्पर (अंदाजे एक ब्रास वाळूसह), एमएच २१ बीएफ १२६२ क्रमांकाचा जेसीबी आढळून आला. वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे चार तराफे, नदीपात्राच्या कडेला साठवून ठेवलेली अंदाजे ३० ब्रास वाळूही जप्त करण्यात आली. या कारवाईदरम्यान हायवा चालक व मालक माधव उत्तमराव गायकवाड हा पोलिसांच्या हाती लागला. तर टिप्पर व जेसीबीचे चालक घटनास्थळावरून पसार झाले. जप्त केलेल्या वाहनांसह इतर साहित्याची एकूण किंमत ७९ लाख ९५ हजार रुपये आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक राहुल गौतम लोखंडे यांच्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलिस स्टेशन येथे हायवाचे चालक-मालक व जेसीबी चे चालक-मालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक निलंगे हे करीत आहेत.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.