छत्रपती संभाजीनगर

गोदा पात्रातील अवैध वाळू उपसा दोन दिवसांत थांबवण्याचे निर्देश

CD
गोदापात्रातील अवैध वाळू उपसा दोन दिवसांत थांबवण्याचे निर्देश छत्रपती संभाजीनगर, ता. ६ : पैठण तालुक्यात गोदावरी नदीपात्रात सुरू असलेले अवैध वाळू उत्खनन दोन दिवसांत थांबवून १० तारखेला कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. नितीन सूर्यवंशी आणि न्या. आबासाहेब शिंदे यांच्या खंडपीठाने पैठणच्या तहसीलदारांना दिले आहेत. तहसीलदारांनी १० नोव्हेंबरला सुटीकालीन न्यायालयासमोर स्वतः उपस्थित राहून केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करावयाचा असून या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. विशाल दत्तात्रय काळे व इतर तिघा जणांनी याबाबत याचिका दाखल केली आहे. शासनाच्या वतीने बाजू मांडताना सरकारी वकिलांनी दावा केला होता की कोणतेही अवैध वाळू उत्खनन सुरू नाही. मात्र, सरकारी वकिलांचा हा दावा न्यायालयाने फेटाळला. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले, की वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार प्रत्यक्षात परिस्थिती पूर्णपणे भिन्न आहे. वृत्तपत्रांमधील पुरावे आणि छायाचित्रे पाहता, सरकारी वकिलांचा अवैध उत्खनन होत नाही हा युक्तिवाद न्यायालयाने धुडकावून लावला. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. विक्रम आर. धोर्डे बाजू मांडत आहेत. ======

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel PM Race: नेतन्याहू यांच्याऐवजी आयझेनकोट इस्रायलचे नवे पंतप्रधान बनणार का? अरब पक्षांनी दिला पाठिंबा; पण नेमका पेच काय?

ACB Action: मोफत कायदेशीर मदतीच्या नावाखाली लाचखोरी! वकील ताब्यात, पत्नीविरोधातही गुन्हा; एसीबीने रंगेहाथ पकडलं

Latest Marathi News Update : गडचिरोलीत माओवाद्यांचा कट उधळला; जंगलात जमिनीखाली लपवला होता स्फोटकांचा साठा

Maharashtra Village Diwali Bonus: महाराष्ट्रातील 'या' गावाची कमाल! गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस; विकासाच्या जोरावर देशभर डंका

Lavrov Deepfake: बनावट व्हिडिओमुळे प्रशांत भूषण अडचणीत; दिल्ली पोलिसांनी दाखल केली FIR

SCROLL FOR NEXT