Imtiaz Jaleel And Devendra Fadnavis esakal
छत्रपती संभाजीनगर

...डोक्यावर हंड्याने हाणतील, इम्तियाज जलील यांची फडणवीसांवर टीका

...डोक्यावर हंड्याने हाणतील

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : औरंगाबादेतील पाणीप्रश्न पेटल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केले होते. भारतीय जनता पक्ष येत्या २३ मे रोजी पाण्यासाठी मोर्चा काढणार आहे. पाणीप्रश्नावर खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी उडी घेतली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तुमच्यात हिंमत असेल तर तुमच्या नगरसेवकांच्या वाॅर्डात महिलांना एकत्र करा, तेव्हा त्या तुमच्याच डोक्यावर हंड्याने हाणतील, असे आव्हान जलील यांनी फडणवीस यांना दिले आहे. सत्तेत बसण्यासाठी भाजपकडून देशात घाणेरडे खेळ खेळले जात आहे. (Imtiaz Jaleel Advise Devendra Fadnavis For Aurangabad Politics)

यात फडणवीस एक खेळाडू आहेत. आमच्या करिता शहराला पाणी महत्त्वाचे आहे. निवडणुकाजवळ आल्या की लोकांना मुर्ख बनवणे कुठपर्यंत करणार असा सवाल त्यांनी केला. आता नौटंकी करण्यासाठी येत आहेत, अशी टीका इम्तियाज जलील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादचे नामांतर आता भाजप सत्तेत आल्यावर होणार असे सांगितले. या प्रसंगी त्यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर केली. नामांतरावरही जलील यांनी फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Corruption News : पैसा डबल करण्याच्या आमिषाला पोलिसही बळी; एसपींच्या आदेशानंतर अधिकाऱ्यांची नावे समोर, घटनेने खळबळ

Manikrao Kokate: १९९६ चा खटला… दिवंगत बापासाठी मुलगी लढली अन् न्याय मिळून दिला, माणिकराव कोकाटेंविरोधात लढलेल्या ॲड. अंजली दिघोळे...

VIDEO : 'गावातील अंबानी शेतकऱ्याचं घर'! 20 एकरातील आलिशान घर पाहून नेटकरीही थक्क; गाड्यांपासून घोड्यांपर्यंत सर्व काही इथे आहे...

Viral Video: किती गोड! आजोबांनी रेल्वेत आजीसाठी केलं असं काही... व्हायरल व्हिडिओ पाहून आनंदाश्रू उभे राहतील

'त्याने माझे खराब व्हिडिओ पोस्ट केले होते' सोशल मीडियाचा अनुभव सांगताना प्राजक्ता माळी म्हणाली...

SCROLL FOR NEXT