Imtiaz Jaleel 
छत्रपती संभाजीनगर

शहराचे नाव बदलण्यासाठी यायचे,मग तुम्ही औरंगाबादला दिले काय : जलील

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : जेव्हा आपल्याला मोठे आंतरराष्ट्रीय क्रीड विद्यापीठ देण्यात आले होते. ते पुण्याला कोणाच्या सांगण्यावरुन हलविण्यात आलेले आहे? सगळे लोक गप्प बसलेले आहेत. मी आज प्रश्न विचारण्यासाठी पालकमंत्र्यांकडे आलेलो आहे. आपण फक्त निवडणुकीच्या वेळी यायचं. लोकांच्या भावना भडकवण्यासाठी यायचे. शहराचे नाव बदलण्यासाठी यायचे. मग तुम्ही या मराठवाड्याला (Marathwada) आणि औरंगाबादला (Aurangabad) दिले काय, असा प्रश्न खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांना विचारला आहे. श्री.जलील हे माध्यमांशी आज रविवारी (ता.१५) बोलत होते. आज स्वातंत्र दिनी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई जात होते. त्यावेळी त्यांना जलील यांच्या नेतृत्वाखाली एमआयएमच्या वतीने काळे झेंडे दाखवून औरंगाबाद येथील क्रीडा विद्यापीठ पुण्याला (Sports University) हलविल्याचे निषेध करण्यात आले.

श्री.जलील म्हणाले, की कशामुळे हे विद्यापीठ मराठवाड्यासारख्या मागासलेल्या भागातून कोणाच्या सांगण्यावरुन हलविले आहे. आमच्या मराठवाडा व औरंगाबादेतील जे तरुण आहेत त्यांच्यासाठी हे विद्यापीठ गरजेचे होते. त्यामुळे ते येथे क्रीडा विद्यापीठ व्हायला पाहिजे होते. मात्र दुर्दैव आहे की सगळे गप्प बसलेले आहेत. दीडशे एकर जागा हवी होती. १३५ एकर जाग निश्चित झाली होती. मात्र तीन राजकीय पक्षांच्या राजकारणामुळे क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलविण्यात आले आहे. आम्ही आमच आंदोलन सुरु ठेवू. आज आम्ही पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखविलेले आहेत. आम्ही आमचे आंदोलन तीव्र करणार आहोत. मुख्यमंत्री आल्यावर हे आंदोलन अधिक तीव्र करु, असा इशारा त्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT