अजूनही धार्मिक सण, उत्सव व कार्यक्रमांवर अनेक कठोर निर्बंध लादण्यात आलेले आहेत. त्यामुळे सर्वच समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.
औरंगाबाद : एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी Vitthal Darshan पायी पंढरपूरला Pandharpur जाण्याऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीला, गणेश उत्सव Ganesh Festival तसेच बकरी ईद Bakari Eid धार्मिक परंपरेनुसार साजरी करण्यास परवानगी द्या. महाराष्ट्रातील सर्व समाजाच्या धार्मिक भावनांचा आदर करुन सहकार्य करा, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील Imtiaz Jaleel यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Chief Minister Uddhav Thackeray यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्रातील सर्व समाजाच्या धार्मिक परंपरेत खंड पडू नये. म्हणून शासनानेही सहकार्याची भूमिका घेणे आवश्यक आहे. अजूनही धार्मिक सण, उत्सव व कार्यक्रमांवर अनेक कठोर निर्बंध लादण्यात आलेले आहेत. त्यामुळे सर्वच समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. imtiaz jaleel demand cm for permission to pandharpur wari, bakari eid celebration
गेल्या अनेक वर्षांपासूनची पायी वारी, दिंडी आणि पालख्यांची पंरपरा सलग दुसऱ्या वर्षी खंडीत होत आहे. शेतकरी, ग्रामीण भागातील नागरिक आणि वारकरी दरवर्षी या धार्मिक सोहळ्यात लाखोंच्या संख्येने सहभागी होत असतात. त्यांना पायी वारी काढू न देता, छळ करणे आणि कायदेशीर कार्यवाही करुन अटक करण्याचा प्रकार निंदनीय आहे, असेही इम्तियाज जलील यांनी पत्रात नमूद केले आहे.
अर्थव्यवस्थेला मदतच होईल
गणेश उत्सव हा देखील महाराष्ट्रातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव असून त्या उत्सवानिमित्त दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. महाराष्ट्रातील Maharashtra गणेशमूर्ती निर्मितीचे काम करणारे कारागीर, गणेशमूर्ती व पूजेचे साहित्य विक्री करणारे छोटे-छोटे व्यापारी संपूर्ण वर्षभर गणेश उत्सवावरच अवलंबुन असतात. तसेच छोट्या व्यापाऱ्यांनी वर्षभर केलेले परिश्रम सार्थक लागतील. यातून होणाऱ्या मोठ्या आर्थिक उलाढालीचा परिणाम राज्याच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा होणार आहे. बकरी ईद हा सण मुस्लिम समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. या निमित्ताने अनेक छोटे-छोटे व्यापारी, शेतकरी व त्यावर अवलंबुन असलेल्या अनेक जण आपले व्यवसाय करून उदरनिर्वाह करत असतात. त्यांना देखील दिलासा देण्याच्या दृष्टीने वरील मागण्यांचा सकारात्मक विचार करून परवानगी द्यावी, अशी मागणी देखील या पत्रात जलील यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.