imtiaz jaleel imtiaz jaleel
छत्रपती संभाजीनगर

Exclusive: 'राज्य आणि केंद्र सरकारच्या लसींच्या राजकारणात हजारो लोकांचा बळी'

खासदार जलील यांनी दिलेल्या मुलाखतीत अनेक मुद्दे मांडले आहेत. सध्या औरंगाबाद शहरात पायाभूत सुविधांचा मोठा अभाव आहे

प्रमोद सरवळे

औरंगाबाद:Exclusive interview imtiaz jaleel: कोरोनाकाळात केंद्र आणि राज्य सरकारमधील लशींच्या राजकारणामुळे राज्यात हजारो जणांना प्राण गमवावे लागले आहेत. या काळात दोन्ही सरकारे एकामेकांवर कुरघोडी करण्यात व्यस्त होती. कोरोनामुळे राज्यातील आरोग्या सुविधांमधील त्रुटी समोर आल्या आहेत. सरकारने आता तिसऱ्या लाटेच्या अगोदर आरोग्य व्यवस्थेवर काम केले पाहिजे, अशी माहिती औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.

'पायाभूत सुविधांही करता आल्या नाहीत'-

खासदार जलील यांनी दिलेल्या मुलाखतीत अनेक मुद्दे मांडले आहेत. सध्या औरंगाबाद शहरात पायाभूत सुविधांचा मोठा अभाव आहे. शहरातील मुख्य भागातील रस्त्यांची अवस्थाही वाईट आहे. तसेच जिल्ह्याला पाण्याच्या गंभीर समस्येलाही सामोरं जावं लागत आहे. जिल्ह्यातील या प्रश्नावर बोलताना खासदार जलील म्हणाले, मागील दोन दशकांपेक्षा जास्त काळापासून भाजप-शिवसेनेची सत्ता महापालिकेत होती. त्यांनी या सुविधांकडे दुर्लक्ष केल्याने आज शहराची ही बिकट अवस्था झाल्याचे खासदार जलील यांनी सांगितले.

आश्वासने नको काम करा-

जसं देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी लाखो-कोटींची पॅकेज जाहीर करत आहेत तसं राज्यांनी करू नये. औरंगाबादला काही 1 लाख कोटी किंवा 2 लाख कोटी नका देऊ, आम्हाला फक्त पाचशे किंवा हजार कोटी दिले तरी जिल्ह्याचा चांगला विकास करता येईल. सरकारने फक्त कागदांवर सह्या करून कोटींची आश्वासने देण्यापेक्षा कामे करावीत, असंही खासदार इम्तियाज जलील यांनी मत मांडले.

महापालिकेतील गोंधळ आणि राज्य सरकारची उदासिनता-

औरंगाबाद जिल्ह्यातील औद्योगिक विकास इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वेगाने होताना दिसत नाही. याबद्दल विचारले असता खासदार जलील म्हणाले, महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे तसेच राज्य सरकारच्या उदासिनतेमुळे जिल्ह्याचा औद्योगिक विकास होऊ शकला नाही. जर जिल्ह्यात किंवा शहरात पायाभूत सुविधाच योग्य नसतील तर इथला औद्योगिक विकास कसा होणार हा प्रश्नही खासदार जलील यांनी उभा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT