CM Uddhav Thackeray And Imtiaz Jaleel esakal
छत्रपती संभाजीनगर

मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर आमची सभा होणार : इम्तियाज जलील

मग आमचं सौ सुनार की एक लोहार की रहेंगी...

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : औरंगाबाद (Aurangabad) महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या सभांमुळे शहरातील वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. बुधवारी (ता.आठ) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर आमचीही सभा होणार असल्याचे खासदार तथा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी सांगितले. (Imtiaz Jaleel Says, After Chief Minister Uddhav Thackeray Rally Ours Rally)

ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सगळ्यांच होऊ द्या. मग आमचं सौ सुनार की एक लोहार की रहेंगी. मुख्यमंत्र्यांची सभेनंतर आमची सभा होणार आहे, असे जलील म्हणाले. आम्हाला लोकांसाठी वाहनांची सोय करण्याची व पैसे देण्याची गरज नाही, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीविषयी जलील म्हणाले, त्याबाबत पक्ष अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी निर्णय घेतील.

आज ओवैसी यांची नांदेडमध्ये आणि उद्या सात जूनला लातूरला सभा होणार आहे. त्यानंतर निवडणुकीबाबत निर्णय घेतला जाईल, असे जलील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT