Imtiyaz Jaleel Latest marathi News Imtiyaz Jaleel Latest marathi News
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद नामांतरावर पवार साहेब बोलले ते हास्यास्पद - इम्तियाज जलील

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकारने शेवटच्या कॅबिनेटच्या बैठकीत औरंगाबादचे नामांतर करून संभाजीनगर केले आहे. यानंतर अनेकांनी याचे स्वागत केले तर अनेकांनी विरोध केला. ‘मविआ’च्या किमान समान कार्यक्रमात नामांतराचा मुद्दा नव्हता. तसेच नामांतराच्या मुद्यावर सुसंवाद झाला नव्हता’ असे शरद पवार (Sharad Pawar) रविवारी औरंगाबादमध्ये म्हणाले होते. ‘औरंगाबाद नामांतरावर पवार साहेब बोलले ते हास्यास्पद आहे’, असे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) म्हणाले. (Imtiyaz Jaleel Latest marathi News)

एकनाथ शिंदे गटाने घेतलेल्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. सरकारच्या भवितव्यावर अनिश्चिततेचे सावट असताना महाविकास आघाडी सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले. त्यापैकी औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय महत्त्वपूर्ण होता. अखेरच्या कॅबिनेटच्या बैठकीत मविआ सरकारने नामांतराचा निर्णय घेतला होता.

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या या वक्तव्यावर खासदार इम्तियाज जलील यांनी सोमवारी (ता. ११) नाराजी व्यक्त केली. अनिल परब यांनी आदल्या दिवशीच औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा कॅबिनेटच्या बैठकीत मांडणार असल्याचे सांगितले होते. यामुळे या विषयी कोणाला माहिती नव्हते हे म्हणणे योग्य नाही, असेही इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) म्हणाले.

अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात व नाना पटोले नामांतरावर स्पष्टपणे बोलले होते. औरंगाबादच्या (Aurangabad) नामांतराला आम्ही विरोध केला नाही, असे बाळासाहेब थोरात म्हणाले होते. सत्तेसाठी गठबंधन केले तेव्हा नामांतराचा मुद्दा पुढे येऊ शकतो, असे लक्षात आले नव्हते का, असा सवालही जलील यांनी उपस्थित केला. कोणताही निर्णय सर्व मंत्र्यांच्या संमतीने होतात, असेही ते म्हणाले.

हिंदू-मुस्लिम असा रंग देऊ नका

अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात कधीही भाजपमध्ये जाऊ शकतात. फक्त औपचारिकता राहिलेली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्रामध्ये काही खरं नाही, असे त्यांना वाटत आहे. औरंगाबाद किंवा संभाजीनगर या निर्णयाला हिंदू-मुस्लिम असा रंग देऊ नका. या प्रकरणाला जातीय रंग देण्याची गरज नाही, असेही एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT