छत्रपती संभाजीनगर

धक्कादायक! हाणामारीत एकाने युवकाच्या हाताचा चावा घेत तोडला लचका

भानुदास धामणे

दरम्यान वासीम शेख याने सलीम याच्या उजव्या हाताचा चावा घेत लचका तोडून गंभीर जखमी केले.

वैजापूर (औरंगाबाद) : किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीत एकाने युवकाच्या हाताचा चावा (bitten the hand) घेत लचका तोडल्याची घटना शनिवारी (ता.आठ) दुपारच्या सुमारास शहरातील कादरीनगर परिसरात घडली. या प्रकरणी वासीम शेख, सना राऊफ शेख, नीता राऊफ शेख व अंजुम शेख (सर्व रा. कादरीनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल (Crime) करण्यात आला. (In a minor dispute in Vaijapur a man has bitten the hand of a youth)

याबाबत पोलिसांनी सांगितले की, सलीम नूर शेख हा शहरातील कादरीनगर परिसरात वास्तव्यास आहे. शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्याची आई व शेजारीच राहणारी सना शेख या दोघींमध्ये भांडण सुरू होते. हे भांडण सोडविण्यासाठी सलीम याने मध्यस्थी करत आई सुन्नबी हिचा हात धरून घराकडे नेण्याचा प्रयत्न करत होता. याचवेळी त्या ठिकाणी वासीम शेख, सना राऊफ शेख, नीता राऊफ शेख व अंजुम शेख हे आले व त्यांनी सलीम व त्याच्या आईला शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान वासीम शेख याने सलीम याच्या उजव्या हाताचा चावा घेत लचका तोडून गंभीर जखमी केले.

(In a minor dispute in Vaijapur a man has bitten the hand of a youth)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT