In jalna protest against police lathi charge sarpanch of Phulumbri taluk burnt his own new car  sakal
छत्रपती संभाजीनगर

Jalna Violence : पोलिसांनी लाठीमार केल्याच्या निषेधार्थ; फुलंब्री तालुक्यातील सरपंचाने जाळली स्वतःची नवी मोटार

लाठीमार करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दोन दिवसांत कारवाई झाली नाही, तर आम्ही स्वतःलाही जिवंत जाळू

सकाळ वृत्तसेवा

फुलंब्री (जि. छत्रपती संभाजीनगर) : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आंदोलनात पोलिसांनी लाठीमार केल्याच्या निषेधार्थ फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील सरपंच मंगेश साबळे यांनी स्वतःची नवी कोरी मोटार जाळल्याची घटना शनिवारी (ता. २) पाल फाटा परिसरात घडली. फुलंब्रीतील महात्मा फुले चौकातही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन केले.

व्हीडिओ प्रचंड व्हायरल

सरपंच साबळे यांनी मागील गेल्या वर्षभरापूर्वी नऊ लाख ८० हजार रुपयांची मोटार घेतली होती. लाठीमाराचा निषेध म्हणून त्यांनी आपली मोटार पेट्रोल टाकून जाळली. याचा व्हीडिओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला आहे. या आंदोलनानंतर फुलंब्री पोलिसांनी सरपंच साबळे यांच्यासह साईनाथ बेडके, वसंत पाथ्रीकर यांना नोटीस बजावली आहे.

‘अन्यथा स्वतःला जिवंत जाळू घेऊ’

याबाबत शेतकरी संघटनेचे साईनाथ बेडके म्हणाले, की आता आम्ही कार जाळली. लाठीमार करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दोन दिवसांत कारवाई झाली नाही, तर आम्ही स्वतःलाही जिवंत जाळून घ्यायला मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT