sambhaji nagar  SAKAL
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar News : मराठवाड्यात मतदार दीड कोटीवर ; तयारी लोकसभा निवडणुकीची, एक लाखाने वाढली संख्या

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांची नव्याने यादी तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांची नव्याने यादी तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नव्याने एक लाख मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे आता मराठवाड्यातील मतदारांची संख्या तब्बल दीड कोटीवर पोचली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर जय्यत तयारी केली जात आहे. त्याचाच भाग म्हणून निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी ऑक्टोबर २०२३ पासून मतदारांची प्रारूप यादी तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यासाठी मराठवाड्यातील एका शहरातून दुसऱ्या शहरात स्थलांतरित अथवा झालेले किंवा मृत झालेल्या मतदारांची नावे यादीतून वगळायचे काम सुरू करण्यात आले. त्याचप्रमाणे नव्याने मतदारांची नोंदणी सुरू करण्यात आली.

याशिवाय मतदारांना घरबसल्या नोंदणी करणे शक्य व्हावे, यासाठी निवडणूक आयोगाने मतदार हेल्पलाइन मोबाइल अॅप तयार केले. या अॅपवरून तरुण मतदारांनी घर बसल्या नोंदणी केली आहे. त्यामुळेच गेल्या तीन महिन्यांत मराठवाड्यातील मतदारांची संख्या एक लाखाने वाढली आहे. पुरुष-महिला व इतरांची २७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत नांदेड जिल्ह्यात २६ लाख ६८ हजार २७९, हिंगोली ९ लाख ३८ हजार ५८, परभणी १४ लाख ७९ हजार १९४, जालना १५ लाख ५४ हजार ५१५, छत्रपती संभाजीनगर २९ लाख ४५ हजार २११, बीड २१ लाख १७ हजार ६१४, लातूर १९ लाख २४ हजार ५३३ तर धाराशिव १३ लाख ६४ हजार ४० इतक्या मतदारांची नोंद होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's Likely Squad For AUS Tour : सूर्यकुमार यादव IN, रोहित, विराटची एन्ट्री; जसप्रीत बुमराह, शुभमन गिल यांना विश्रांती

Diwali 2025: यंदा दिवाळी 20 कि 21 ऑक्टोबर? जाणून घ्या 5 दिवसांच्या दिपत्सोवसाची संपूर्ण यादी

D-Mart Income: बापरे! डीमार्टची 'ही' फक्त तीन महिन्यांची कमाई… आकडा वाचून थक्क व्हाल

Uddhav Thackeray : ठाकरेंच्या शिवसेनेचे कोकण आता नाही राहिलं, एकनाथ शिंदेंनी मोठा गळ टाकला; राजन तेलींचा शिवसेना प्रवेश

Shivkalin Wagh Nakh : कोल्हापुरात शिवकालीन वाघनखे दाखल, उद्‍घाटनासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ मिळणार का?

SCROLL FOR NEXT