parbhani sakal
छत्रपती संभाजीनगर

Parbhani News : जिल्ह्यात आतापर्यंत रब्बी हंगामातील पेरणी ५२ टक्केच, निम्मे क्षेत्र कोरडेच

आतापर्यंत तब्बल १७९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. याची टक्केवारी ८७.३१ आहे.

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : जिल्ह्यात आतापर्यंत रब्बी हंगामातील पेरणी ५२ टक्केच झाली आहे. ४८ टक्के क्षेत्र कोरडेच आहे. जिल्ह्यात एक लाख ७६ हजार ८९१ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी ९१ हजार ७५६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामाची पेरणी आटोपत आली आहे. मागील वर्षी १ लाख ३५ हजार २०८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे यावर्षी निम्मे क्षेत्र नापेर राहणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. जिल्ह्यात खरीप हंगामाने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले. सोयाबीन, मूग, उडीद आदी पिके हातची गेली तर आळीच्या हल्ल्याने कापूस, तूर पीकही जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांची नजर रब्बी हंगामावर होती. त्यानूसार शेतक-यांनी सोयाबीन पीक निघताच रब्बीची तयारी केली. मात्र, जमिनीत ओलावा नसल्याने पेरणीवर मर्यादा आली. ओल पाहून अनेकांनी हरभरा, गहू, ज्वारी पिकाला पसंती दिली. जिल्ह्यात १ लाख ७६ हजार ८९१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र, नोव्हेंबर महिन्यात अखेरपर्यंत ५१. ८७ टक्के पेरणी झाली. यामुळे यावर्षी अर्धे क्षेत्र पेरणी विनाच आहे.

अखेरच्या आठवड्यात अवकाळी पाऊस

जिल्ह्यात नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले असले, तरी जमिनीत ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. यंदा जिल्ह्यात करडई पिकाचा पेरा वाढल्याचे चित्र आहे. २०५७ हेक्टर क्षेत्रावर करडईचा पेरा अपेक्षित होता. आतापर्यंत तब्बल १७९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. याची टक्केवारी ८७.३१ आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ५२ टक्के रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत. जमिनीत ओलावा नसल्याने शेतकऱ्यांना पेरण्या केल्या नाहीत. मात्र आता जिल्ह्यात झालेल्या पावसाने ओलावा निर्माण झाला. याचा फायदा रब्बीच्या पिकांना होणार आहे.

— शिवराज घोरपडे (जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhya Pradesh Congress: मध्य प्रदेशच्या राजकारणात नवा राजकीय भूकंप...; कमलनाथ यांनी केला गौप्यस्फोट!

Konkan Railway: मुंबईहून सावंतवाडीला सुटणार विशेष गाड्या; गणेशोत्सवात प्रवाशांना दिलासा

Latest Marathi News Updates: वेळ पडली तर गेवराईतून निवडणुकीला उभं राहणार- हाके

Manchar News : मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताची आंबेगाव तालुक्यात जय्यत तयारी; तीन हजार समाज बांधव मुंबईत जाणार

Asia Cup 2025: Inshallah! भारतीय संघाला दोन्ही सामन्यांत धुळ चारू; IND vs PAK मॅचपूर्वी हॅरिस रौफचा फाजील आत्मविश्वास

SCROLL FOR NEXT