आदिवासी sakal
छत्रपती संभाजीनगर

स्वातंत्र्याचा अर्थ कळू द्या, आता तरी घास मिळू द्या

अमृतमहोत्सवी वर्षातही रानोमाळ भटकंती करणाऱ्या आदिवासींचा टाहो

राजानंद सुरडकर, कन्नड

कन्नड : देशभरात स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीनिमित्त अमृत महोत्सव साजरा होत आहे. मात्र, उत्पादन साधनांचा अभाव असलेल्या आदिवासी, भिल्ल, वंचितांना जिवन मरणाचा संघर्ष आजही सुरू आहे. त्यामुळे स्वातंत्र्याचा अर्थ कळू द्या, आता तरी गरिबाला घास मिळू द्या, असा टाहो अमृत महोत्सवी वर्षातही रानोमाळ भटकंती करणाऱ्या आदिवासींनी केला आहे.

कन्नड तालुक्यातील कळंकी, अंबावाडी, चिवळी, कोळवाडी, अंबाला, पेडकवाडी, तांदुळवाडी, कोल्हार, चिमणापूर, ठाकरवाडी, धामणडोह, महादेव खोरा, बिबखेडा आदी २२ तांड्यांवर आदिवासी समाज जीवन मरणाचा संघर्ष करत आहेत. त्यांना उत्पादनाची साधने नाहीत, जात प्रमाणपत्र मिळत नाहीत. त्यामुळे त्यांना शैक्षणिक व शासकीय योजनांचा लाभ, सवलती मिळत नाहीत. भूमिहीन असल्याने त्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी दररोज संघर्ष करावा लागतो.

पावसाळ्यात हा संघर्ष अधिक खडतर होतो.

पोटाची खळगी भरण्यासाठी रानोमाळ, जंगलात कंदमुळे, भाज्या मिळविण्यासाठी भटकंती करावी लागते. कळंकी येथील आदिवासी रावजी पथवे म्हणाले की, आम्हाला हक्काची शेतजमीन नाही. ज्यांनी वनजमीनी काढल्या होत्या. त्यावर बुलडोझर फिरवण्यात आले. जी अत्यल्प शेतजमीन आहे. ती खडकाळ आहे. आषाढ, श्रावणात पावसाची झडी लागते. जमीनदारांच्या शेतात मजूर म्हणूनही काम मिळत नाही. अशावेळी भूक भागविण्यासाठी आम्हाला जंगलात, रानोमाळ भटकंती करावी लागते. कधी भाज्या मिळाल्या नाहीत तर जनावरेही खात नाहीत, अशा विषारी भाज्याही खाव्या लागतात.

सुल्याबाई मेंगाळ यांनी सांगितले की, भूकेपुढे काहीच चालत नाही .शेळ्या मेंढ्यांप्रमाणे मिळेल तो पाला पोटात भरून दिवस ढकलावे लागतात. महागाई प्रचंड वाढली आहे. तेल तर अप्रूप आहे. पीठ मिळाले नाही तर नुसत्याच भाज्या उकडून खाव्या लागतात. आदिमजाती सेवा मंडळाचे अध्यक्ष आदिवासी कार्यकर्ते बद्रीनाथ कतारे यांनी सांगितले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातही आदिवासी समाज जीवन मरणाचा संघर्ष करीत आहेत. आता तरी शासनाने आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी पुढाकार घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: भारतीय संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड! T20I क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणीच न केलेला पराक्रम करून दाखवला

Govinda Insurance: गोविंदांसाठी आनंदाची बातमी! २ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; दहीहंडीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Nanded News: नांदेड जिल्हा बँक निवडणुकीचा आज देगलूरात फैसला; सहकारातील राजकीय चुरस शिगेला

नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीनंतर प्रशासनात मोठा बदल; २० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या यादी...

Farmer Loan Waiver List : सिंधुदुर्गातील 307 गावांतील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'कर्जमुक्ती'ची पहिली यादी जाहीर; 6,711 शेतकरी पात्र, 53 कोटींहून अधिक निधी अपेक्षित

SCROLL FOR NEXT