छत्रपती संभाजीनगर

षडयंत्राबाबत चर्चा करण्याची आवश्यकता नाही ः हर्षवर्धन त्रिपाठी

CD
षड्‍यंत्राबाबत चर्चा करण्याची आवश्यकता नाही ः हर्षवर्धन त्रिपाठी रेल्वे स्टेशन ः भारतात षड्‍यंत्रांबाबत चर्चा करण्याची आवश्यकता नाही. अशी षड्‍यंत्रे ही मुघल काळापासून नव्हे, तर अनादी काळापासून होत आली आहेत. ती आजही सुरूच आहेत. त्यामुळे या षड्‍यंत्रांचा वारंवार उल्लेख करून काहीही फायदा नसल्याचे मत पत्रकार हर्षवर्धन त्रिपाठी यांनी व्यक्त केले. मराठवाडा युवक विकास मंडळ तसेच देवगिरी बँकेच्या सहकार्याने स्व. प्रल्हाद अभ्यंकर व्याख्यानमालेत ते बोलत होते. व्याख्यानमालेचे शेवटचे पुष्प गुंफताना त्रिपाठी यांनी ‘नवीन भारत आणि षड्‍यंत्रांचे चक्रव्यूह’ या विषयावर बुधवारी (ता. तीन) मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी बबनराव जगाडे, तसेच व्याख्यानमाला प्रमुख प्रा. नामदेव कराड उपस्थित होते. पुढे बोलताना त्रिपाठी म्हणाले, की भारत काय चांगले करत आहे आणि नव्या भारताच्या उदयासाठी काय प्रयत्न सुरू आहेत, हे सांगितले पाहिजे. भारताचे वैभव काय आहे, तर ते प्रभू श्रीराम आहेत. राम मंदिराची ज्या दिवशी स्थापना झाली, त्याच दिवसापासून नव्या भारताचा उदय झाला. या वेळी भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बबनराव जगाडे आणि व्याख्यानमाला प्रमुख प्रा. नामदेव कराड यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर अध्यक्षीय भाषणात जगाडे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. किशोर शितोळे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रा. नामदेव कराड यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. योगिता तौर-होके यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष व्यंकटेश कमळू यांनी आभार मानले. पद्म राजेश लेहेकर आणि तृप्ती पालोदकर यांनी वंदे मातरम् गीत सादर केले. यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL ODI: भारत-श्रीलंका संघातील वनडे सामना दिल्लीतून अचानक हलवला, आता कोणत्या मैदानात होणार मॅच?

Video: जंगलाचा क्रूर कायदा! माकडाला उड्या मारण्याची शिक्षा, सिंहिणीने जिवंतच फाडलं...

Latest Marathi News Live Update : भारतीय हवाई दलाकडे लढाऊ विमानांची कमतरता

DIWALI DIYA LIGHTING TIPS AND TRICKS: दिवाळीत वाऱ्यामुळे पणत्या वारंवार विझतायत? दिवे तेवत ठेवण्यासाठी सोशल मीडियावर व्हायरल होतेय 'ही' ट्रिक!

Satara News: महामार्गावरील वाहतूक काेंडी लांबणारच! शेतकरी संघटनांचा कारखानदारांना दोन दिवसांचा अल्टीमेटम... अन्यथा जिल्हा बंद

SCROLL FOR NEXT