Bibtya e sakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : बिबट्याच्या हल्ल्यात एक जखमी

राजनगर परिसरातील घटना ; दोन कुत्र्यांचा पाडला फडशा

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : राजनगर मुकुंदवाडी परिसरात रेल्वे स्थानकालगत बिबट्याने शुक्रवारी(ता.१०) रात्री दोन वाजता एका घरात झोपलेल्या व्यक्तीवर हल्ला केला. प्रतिकार केल्याने बिबट्या पळाला. जखमी व्यक्तीला रक्तबंबाळ अवस्थेत घाटीत दाखल करण्यात आले. बिबट्याने धावून आलेल्या दोन कुत्र्यांनाही फस्त केले असून या घटनेमुळे नागरिकांत भितीचे वातावरण आहे.

मुकुंदवाडी रेल्वे स्थानकालगत राजनगरात शुक्रवारी पहाटे दोन वाजता संजय शेजवळ यांच्यावर बिबट्याने घरामध्ये घुसून हल्ला केला. उजव्या पायाचा पंजा पकडून बिबट्या ओढत असताना त्यांनी आरडाओरड केली. त्यांनी जोरदार प्रतिकार केल्याने बिबट्या तेथून पळून गेला. संजय शेजवळ यांनी जखमी अवस्थेत घाटी रुग्णालय गाठले. त्यांच्या पायात चार दात खोलवर घुसले असून, गंभीर जखमा झाल्या आहेत. बिबट्या शनिवारी पुन्हा याच भागात आला. त्यावर धावून गेलेल्या दोन कुत्र्यांचा बिबट्याने फडशा पाडला. परिसरातील तरुणांनी बिबट्याचा पाठलाग केला; परंतु तो सापडला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंचा रोख कुणाकडे? ''राज्यातील बड्या नेत्यांचं मला संपवायचं कारस्थान...''

IPL 2026 Marathi News: वैभव सूर्यवंशीला आयपीएल सुरू होण्यापूर्वी कॅप्टन रियान परागचा सल्ला; म्हणाला, त्यांच्यापासून दूर राहा...

Dombivli: डोंबिवलीत २८वी स्वागतयात्रा; संस्कृती आणि राष्ट्रभावनेचा भव्य संगम, यंदा काय खास ठरलं? जाणून घ्या...

Viral Video : ही तर साक्षात देवीच! निरागस डोळे अन् मोहक हास्य; अवघ्या 3 महिन्यांच्या चिमुकलीचं हे रूप पाहून तुम्हीही भारावून जाल, व्हायरल व्हिडिओने जिंकली लाखो हृदय

Junnar News : जुन्नरमध्ये डॉक्टरकडे खंडणीची मागणी; बेकायदेशीर बांधकामाचा धाक दाखवत ३५ लाखांची मागणी

SCROLL FOR NEXT