file photo
file photo 
छत्रपती संभाजीनगर

वंजारी सेवा संघाने मराठवाड्यासाठी काय केली मागणी ? ... वाचा

मधुकर कांबळे

औरंगाबाद : वैद्यकीय शिक्षण विभागाकडून भरल्या जाणाऱ्या ८५ टक्के राज्यस्तरीय एमबीबीएसच्या जागांसाठी ७०/३० हा प्रवेश नियम डीएमईआरच्या महितीपुस्तिकेत समाविष्ट करण्यात आला आहे. या प्रादेशिक आरक्षणास कोणतेही संवैधानिक व कायदेशीर पाठबळ नाही.

यामुळे या माहितीपुस्तिकेतील ७० /३० आरक्षण चालू शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून रद्द करुन वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेची निवड यादी गुणवत्तेनुसार पूर्ण राज्यात एकच निवड यादी लावण्यात यावी, अशी मागणी वंजारी सेवा संघाच्यावतीने करण्यात आली. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

वंजारी सेवा संघाच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनात ही मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, प्रादेशिक विभागानुसार आरक्षणावेळी त्या त्या विभागातील शासकीय व खासगी मेडीकल कॉलेज, जागांची संख्या, विद्यार्थी संख्या याचा कोणताही विचार न करता वर्षानुवर्ष वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील मराठवाड्याच्या विद्यार्थ्यांवर अन्याय सुरू आहे.

मराठवाड्यात शासकीय व खासगी असे मिळून सहा मेडीकल कॉलेज असून ९०० जागा आहेत. तर उर्वरीत महाराष्ट्रात शासकीय व खासगी अशा २६ मेडीकल कॉलेज असून ३,९५० जागा तर विदर्भात ९ मेडीकल कालेज आहेत. त्यात १ हजार ४५० जागा आहेत. त्यामुळे लागू असलेल्या कोट्यामुळे गुणवत्ता असूनदेखील मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशापासून वंचित रहावे लागत असल्याचे म्हटले आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून राज्यभरातील विद्यार्थ्यांची एकच निवड यादी लावावी व मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना मुंबई, पुणे, नागपुर येथील मेडीकल कालेजमध्ये शिकण्याची संधी द्यावी व प्रवेश प्रक्रीयेतील ७०-३० कोट्यामुळे होणारा भेदभाव दूर करावा, अशी मागणी महासंघाचे प्रदेशाथ्यक्ष अनिल फड, प्रदेश कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. खुशाल मुंढे यांनी केली. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: नागपूरकडे निघालेल्या हेलिकॉप्टरचं जालन्यात इमर्जन्सी लँडिंग

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Shilpa Shetty: शिल्पाच्या मुलाला पंजुर्लीने दिला आशीर्वाद! काय आहे शिल्पाचं कांतारा कनेक्शन ?

Big Discount: केंद्रानंतर 21 राज्यांनी केली घोषणा! जुनी कार स्क्रॅप करून नवीन कारवर मिळेल 50 हजारांची सूट

SCROLL FOR NEXT