छत्रपती संभाजीनगर

इनोव्हा कारसह सव्वातीन लाखांची रोकड पळवली!

CD
इनोव्हा कारसह सव्वातीन लाखांची रोकड पळवली! ---- छत्रपती संभाजीनगर, ता. ३ : इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टरला तब्बल १२ कोटी रुपयांच्या कमिशनची मागणी करत १० ते १२ गुंडांनी धमकावून त्यांची १५ लाख रुपये किमतीची इनोव्हा कार आणि ३ लाख २५ हजार रुपयांची रोकड पळवून नेल्याची धक्कादायक घटना चिकलठाणा एमआयडीसी परिसरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात दोन मुख्य संशयितांसह इतर गुंडांविरुद्ध जबरी चोरी, खंडणी व धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. फिर्यादी ज्ञानेश्वर दादासाहेब बारे (वय ३४, रा. शाश्वत रेसिडेन्सी, ईटखेडा, पैठण रोड) हे इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टर म्हणून व्यवसाय करतात. संशयित आरोपी राहुल चाबुकस्वार हा बारे यांच्याकडे १२ कोटी रुपये कमिशन देण्यासाठी सतत दबाव टाकत होता. ३० सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास बारे हे चिकलठाणा एमआयडीसी येथील महिंद्रा शोरूममागील आर्किटेक्ट भूषण जोशी यांच्या कार्यालयाजवळ असताना आरोपींनी पाठवलेल्या १० ते १२ गुंडांनी त्यांना गाठले. गुंडांनी फिर्यादीला धमकावून त्यांची सुमारे १५ लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार (एमएच २० एफयू ७०००) आणि कारमध्ये ठेवलेली ३ लाख २५ हजार रुपयांची रोख रक्कम बळजबरीने ताब्यात घेऊन पोबारा केला. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, ते दबावाखाली येऊन शरण यावेत आणि सांगितल्याप्रमाणे वागावेत म्हणून सुधीर कातकडे व राहुल चाबुकस्वार यांच्या सांगण्यावरूनच हा कट रचण्यात आला होता. लुटलेली कार व रोख रक्कम आरोपींनीच लपवून ठेवल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? २० वर्षे जुनं प्रकरण पुन्हा उघडलं; PWD कनेक्शन नेमकं काय?

सिल्लोड-जळगाव महामार्गावर भीषण अपघात; पालोद येथे भरधाव ट्रकच्या धडकेत १५ वर्षीय बालकाचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : धुळ्यात महसूलमंत्री बावनकुळेंनी अधिकाऱ्याची शेतातच घेतली ‘शाळा’

Noida Crime : सातव्या महिन्यातच मुलाचा जन्म, उपचारासाठी खर्च झाले ४० लाख; इंजिनिअरने कर्ज, तवाणावातून ४३ व्या मजल्यावरुन उडी मारुन जीवन संपवले

Pitru Paksha 2026: सर्वपित्री अमावस्येला नवरात्रीच्या पूजेचे सामान खरेदी करावे की नाही? जाणून घ्या नियम...

SCROLL FOR NEXT