1traps1 
छत्रपती संभाजीनगर

एकात्मिक कीड व्यवस्थापन करताय? या वापरा पद्धती

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद: खरिपातील सध्या जवळपास सर्वच पिकांची पेरणी आटोपल्याचे चित्र जिल्हाभरात आहे. तसेच काही ठिकाणी आंतरमशागतीस सुरवात झाली आहे. कपाशी पिकात तूर पिकात नांगे भरणे सुरु आहे.

मुळात नांगे म्हणजे उगवले नाही त्या ठिकाणी त्याच पिकाचे आणि त्याच वाणाचे बियाणे लागवड करणे होय. एकात्मिक पीक व्यवस्थान करताना आंतरमशागतीसारखी कामे महत्त्वाची असून ती योग्य पद्धतीने करावीत असे आवाहन विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्रातर्फे करण्यात आले आहे. 

पूर्वमशातीचे सर्व काम आटोपले जरी असले तरी आंतरमशागत करताना विविध पद्धतींचा वापर केला जातो. याचाच एक प्रकार म्हणजे यांत्रिकी पद्धत. यात विविध यंत्राचा वापर करून किडीचा बंदोबस्त केला जातो. पिकांत चिकट सापळे लावणे, कीडग्रस्त भाग काढणे किंवा हाताने कीड जमा करणे अशी कामे मशागतीत येतात.

मशागतीच्या भौतिक पद्धतीत वातावरणातील अजैविक घटक तापमान आद्रता इत्यादी घटकांकडून कीड व्यवस्थापन करण्यासोबतच जास्त पाऊस झाला असल्यास पिकात साचलेले पाणी चर करुन बाहेर काढणे आदि कामे करावी.

याशिवाय जैविक पद्धतीत मित्रकिडीचे संगोपन करत पिकाचे शत्रू म्हणजे कीड मारणे अशी ही जौविक पद्धत आहे. याशिवाय रासायनिक पद्धतीमध्ये शेतकऱ्यांना फवारणी करण्याचे सर्वच कीटकनाशके माहिती असतातच, मात्र ती कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार द्यावीत असेही आवाहन विस्तार केंद्राद्वारे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: टाटा समूहाच्या वादात शरद पवारांची एन्ट्री! टाटा ट्रस्टबाबत पोस्ट करत म्हणाले...

लालबागच्या राजाच्या चरणी केलेलं दान कुणाच्या खिशात जातंय? अभिनेत्रीने ठेवलेली ५०० ची नोट गायब होताच, नेटकऱ्यांचा सवाल

INDW vs SLW Final : 'गोल्डन गर्ल्स'! भारतीय संघाने इतिहास रचला, श्रीलंकेला नमवून जिंकले दुसरे सुवर्णपदक; स्मृती, शफाली, रिचा चमकल्या

Marathi News Live Updates : आयआयटी मुंबईबाहेर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Hupari Rendal Police News : पत्नीच्या निधनाच्या नैराश्यातून रेंदाळमध्ये वृद्धाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT