छत्रपती संभाजीनगर

लोळगे आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्यापासून

CD
उद्यापासून लोळगे आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचा थरार .... माजी कसोटीपटू करसन घावरी यांच्या हस्ते होणार उद्‍घाटन .... छत्रपती संभाजीनगर, ता. १७ : औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या वतीने यंदापासून सुरू करण्यात आलेल्या लोळगे आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेला शनिवारी (ता.१९) प्रारंभ होत आहे. भारताचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू करसन घावरी यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्‍घाटन होईल. संघटनेचे सचिव शिरीष बोराळकर यांनी सांगितले की, संघटनेचे माजी अध्यक्ष सुभाष लोळगे यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा घेण्यात येत असून स्पर्धेच्या यशस्वितेसाठी त्यांचे चिरंजीव विशाल लोळगे यांनी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी पुढाकार घेतला आहे. उद्‍घाटन सोहळ्याला करसन घावरी यांच्यासह सीएसएमआरडीएच्या सहआयुक्त अंजली धानोरकर यांची प्रमुख उपस्थिती राहील. एडीसीए आणि देवगिरी कॉलेज मैदानावर हे सर्व सामने खेळवले जातील. या स्पर्धेत एकूण २० नामांकित शाळांचे संघ सहभागी होतील. सर्व संघांची अ, ब, क आणि ड अशा चार मुख्य गटांमध्ये विभागणी करण्यात आली असून, प्रत्येक गटात ५ संघांचा समावेश आहे. खेळाडूंना भरपूर अनुभव आणि संधी मिळावी म्हणून ‘राउंड रॉबिन’ लीग पद्धत अवलंबण्यात आली आहे. यामुळे साखळी फेरीत प्रत्येक संघ आपल्या गटातील उर्वरित चारही संघांविरुद्ध प्रत्येकी १ अशा प्रकारे तब्बल ४ साखळी सामने खेळतील. साखळी फेरीत १९ ते २५ सप्टेंबर दरम्यान एकूण ४० सामने पार पडतील. त्यानंतर चारही गटांतील अव्वल (विजेता) संघ थेट उपांत्य फेरीत प्रवेश करेल. २६ सप्टेंबरला दोन्ही उपांत्य सामने (सेमीफायनल) तर २७ सप्टेंबर रोजी एडीसीए मैदानावर अंतिम सामना रंगणार आहे. सलामीची लढत १९ सप्टेंबर रोजी सकाळी आठला एडीसीए मैदानावर गट ‘ड’ मधील एसएफएस हायस्कूल विरुद्ध गायकवाड ग्लोबल स्कूल यांच्यात रंगणार आहे. दररोज दोन्ही मैदानांवर मिळून सकाळी ८, ११ आणि दुपारी दोनला अशा तीन सत्रांत सामने खेळवले जातील. -------- चाट गटांत २० संघ गट अ ः द वर्ल्ड स्कूल, नॅशनल इंग्लिश स्कूल, एंजल किड्स इंटरनॅशनल स्कूल, नाथ व्हॅली स्कूल, चाटे स्कूल. गट ब ः स्टेपिंग स्टोन हायस्कूल, होलीक्रॉस इंग्लिश स्कूल, केंब्रिज स्कूल, एचएपी इंटरनॅशनल स्कूल, राजा शिवाजी विद्यालय. गट क : सीएसएन इंटरनॅशनल स्कूल, वूडरिज स्कूल, लिटल फ्लॉवर हायस्कूल, एसबी हायस्कूल, पोदार इंटरनॅशनल स्कूल. गट ड ः एसएफएस हायस्कूल, गायकवाड ग्लोबल स्कूल, देवगिरी ग्लोबल अकॅडमी, आरजे इंटरनॅशनल स्कूल, लिटल एंजल स्कूल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam Latest Update : ...अखेर राज्यसेवा 2025 च्या मुलाखती ढकलल्या पुढे; नवी तारीख काय? मुख्य परीक्षेबाबत अद्यापही अस्पष्टता!

Rekha Gupta Organ Donation : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी रेखा गुप्तांचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प; नागरिकांनाही आवाहन

आमचे मार्ग आता जुळत नाहीत! Prithvi Shaw अन् आकृती अगरवाल यांचा वेगळा होण्याचा निर्णय; क्रिकेटपटूच्या पोस्टची चर्चा...

लग्नानंतर स्वयंपाक शिकली मेघना एरंडे; म्हणाली- माहेरची आणि सासरची लोकं गणेशोत्सवात आमच्या घरी येतात आणि...

Latest Marathi News Update : NTA कडून वर्षभरातील परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर

SCROLL FOR NEXT