छत्रपती संभाजीनगर

हिंगोलीतील विद्यार्थ्यांनी मांडल्या अभिनव संकल्पना

CD
NWN26B03613 नवीन नांदेड : आविष्कार महोत्सवाचे उद्‍घाटन कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते फित कापून झाले. यावेळी उपस्थित मान्यवर. --------- हिंगोलीतील विद्यार्थ्यांनी मांडल्या अभिनव संकल्पना ------- नांदेडच्या ‘आविष्कार’मध्ये चार जिल्ह्यांतील १६४ संशोधक सहभागी ---- हिंगोली, ता. ३० : रोबोटिक ड्रग डिलिव्हरी सिस्टीम, फिश म्युकस बायो इनोव्हेशन, कोकोनट शेल फॉर क्लीन वॉटर, जलरक्षक वॉटर क्वालिटी सेन्सर, डिजिटल लेबर आयडेंटिटी, बालकांसाठी पालेभाज्या चूर्ण ते महिला सुरक्षा ॲप अशा विविध नाविन्यपूर्ण संकल्पना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या आविष्कार संशोधन महोत्सवात विद्यार्थ्यांनी सादर केल्या. या महोत्सवात नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांतील १६४ संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. भाषा वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुलाच्या वतीने विद्यापीठाच्या औषधनिर्माणशास्त्र संकुलात आयोजित या महोत्सवाचे उद्‍घाटन कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते फित कापून झाले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य इंजि. नारायण चौधरी, डॉ. हनुमंत कंधारकर, औषधनिर्माणशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. संजय पेकमवार, ''आयआयएल'' संचालक डॉ. शैलेश वाढेर, भाषा संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर, संयोजक डॉ. पी. विठ्ठल व समन्वयक डॉ. काशिनाथ बोगले यांची प्रमुख उपस्थिती होती. या आविष्कार महोत्सवात विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून विविध नवनवीन विषय मांडले. मानव्यविज्ञान, मूलभूत विज्ञान, वाणिज्य-व्यवस्थापन, कृषी व पशुविज्ञान, अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण अशा विविध श्रेणींमध्ये शंभराहून अधिक नवनवीन प्रकल्प व पोस्टर्स सादर करण्यात आले. कुलगुरू आणि प्र-कुलगुरूंनी सर्व स्टॉल्सला भेटी देऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या प्रकल्पांची माहिती घेतली. दिवसभर चाललेल्या या महोत्सवात सकाळच्या सत्रात पोस्टर प्रदर्शन, तर दुपारच्या सत्रात पोडियम सादरीकरण पार पडले. या प्रदर्शनातून खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांतील नवोन्मेषाला व्यासपीठ मिळत असल्याचे मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले. ------------ संकल्पनांचे उपयोजन झाले पाहिजे विद्यार्थ्यांच्या अभिनव संशोधन संकल्पना केवळ कागदावर किंवा प्रदर्शनापुरत्या मर्यादित न राहता त्यांचे प्रत्यक्ष उपयोजन झाले पाहिजे आणि त्यातून उद्योगनिर्मिती घडली पाहिजे, अशी अपेक्षा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP PM Candidate Announcement for 2029 : २०२९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा PM पदाचा चेहरा ठरला! बैठकीत अमित शाहांनी अचानक जाहीर केलं 'हे' नाव; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ!

China EV Crisis: चिनी इलेक्ट्रिक कारचा जगात डंका, पण मायदेशात ठणठणाट! चीनच्या ईव्ही उद्योगाचं गणित कसं बिघडलं?

IND vs NZ, 4th T20I: टीम इंडियाचं नेमकं काय चुकलं? कर्णधार श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगिलतं; फिलिप्सचंही केलं भरभरून कौतुक

Marathi News Live Updates : सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध

Maharashtra School Diwali Vacation District Wise : शाळांच्या दिवाळी सुट्ट्यांबाबत पालकांमध्ये संभ्रम; तुमच्या जिल्ह्यात शाळा कधी बंद होणार अन् कधी सुरू? पाहा जिल्ह्यानिहाय संपूर्ण यादी!

SCROLL FOR NEXT