ED esakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji nagar : उपायुक्त थेटे यांची इडीकडून चौकशी

३९ हजार घरांसाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यात अनियमितता झाल्याचे राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीच्या चौकशीतून समोर आले

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान आवास योजनेसाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रकरणाचा तपास अंमलबजावणी संचालनालयाकडून (इडी) केला जात आहे. सोमवारी (ता. २०) महापालिकेच्या उपायुक्त तथा घरकुल योजनेच्या विभागप्रमुख अपर्णा थेटे मुंबईतील इडी कार्यालयात हजर झाल्या. त्यांची अनेक तास चौकशी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महापालिकेने प्रकल्पासाठी सुमारे ३९ हजार घरांसाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यात अनियमितता झाल्याचे राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीच्या चौकशीतून समोर आले. दरम्यान या प्रकरणाचा तपास इडीकडे गेला आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. १७) शहरात येऊन विविध ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. महापालिका मुख्यालयात येत कागदपत्रे हस्तगत केली. तसेच उपायुक्त अपर्णा थेटे यांना चौकशीसाठी मुंबईला बोलाविण्यात आले होते. त्यानुसार सकाळी १० वाजता अपर्णा थेटे या इडी कार्यालयात हजर झाल्या. तिथे त्यांची चौकशी झाल्याचे समजते.

यासंदर्भात प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, इडीचा तपास स्वतंत्रपणे सुरू आहे. श्रीमती थेटे या त्या विभागप्रमुख होत्या. तसेच महापालिकेतर्फे कंत्राटदाराविरोधात देण्यात आलेल्या तक्रारदार त्यात आहेत. त्यामुळे इडीने त्यांना बोलविले असावे. दिवसभरात त्यांच्याकडून मला कुठलीही माहिती आलेली नाही, असे डॉ. चौधरी यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk Hunger Strike : 'सोनम वांगचुक फक्त दोन दिवस जगतील', दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र, दिल्ली सरकारवर ताशेरे ओढत बजावली नोटीस

Akola: ५०० रुपयासाठी अंगणवाडीत मीटर लागेना!; चिमुकल्यांची गैरसोयः चार महिन्यांपासून वीज बिल; सीईओंनी दखल घेण्याची मागणी

Latest Marathi News Update : लालपरीचा प्रवास महागणार? १३.५०% भाडेवाढीचा प्रस्ताव

Pandharpur Cycle Wari : सायकल रिंगण सोहळ्यात धुळे सायकलिस्टचा डंका; लक्षवेधी पंढरपूरची वारी 76 वर्षीय दिवाणतात्यांसह 40 सायकलस्वारांकडून पूर्ण

Pune: बारामतीतील कण्हेरी वनउदयानाचे अजितदादा पवार यांच्या नावाने नामकरण

SCROLL FOR NEXT