छत्रपती संभाजीनगर

इसापूर धरणातून रब्बी व उन्हाळी हंगामासाठी प्रत्येकी दोन सिंचन आवर्तने; पहिली पाणीपाळी १ नोव्हेंबरपासून

CD
‘इसापूर’च्या उजव्या कालव्याची पहिली पाणीपाळी रविवारपासून ---- हिंगोली, ता. २९ (बातमीदार) : पिण्याच्या पाण्याचे आरक्षण आणि उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करून ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर धरणाच्या उजव्या कालव्यातून रब्बी व उन्हाळी हंगामासाठी प्रत्येकी दोन सिंचन आवर्तने प्रस्तावित करण्यात आली आहेत. रब्बी हंगामातील पहिले आवर्तन १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे नियोजन असून, सिंचनासाठी इच्छुक शेतकरी व लाभधारकांनी विहित नमुन्यात पाणी मागणी अर्ज संबंधित शाखा कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे. दुष्काळामुळे ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याचे पाणी राखीव ठेवण्यात आले असून उपलब्ध होणाऱ्या शिल्लक पाणीसाठ्याच्या आधारे रब्बी व उन्हाळी हंगामाचा प्राथमिक सिंचन कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. त्यानुसार रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन १ ते २४ नोव्हेंबर, दुसरे आवर्तन २० डिसेंबर ते १३ जानेवारी, उन्हाळी हंगामात पहिले आवर्तन १ ते २४ मार्च २०२७ आणि दुसरे २० एप्रिल ते १४ मे २०२७ दरम्यान सोडण्यात येणार आहे. दरम्यान, अपरिहार्य किंवा तांत्रिक कारणांमुळे पाणीपुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्यास तसेच कालव्याच्या दुरुस्तीची आवश्यकता भासल्यास पाणीपाळीच्या नियोजनात बदल होऊ शकतो. त्यामुळे सर्व लाभधारकांनी विहित मुदतीत पाणी मागणी अर्ज सादर करून प्रचलित नियम व अटींचे पालन करावे आणि सिंचन व्यवस्थापनासाठी जलसंपदा विभागास सहकार्य करावे, असे आवाहन उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. १ चे उपकार्यकारी अभियंता ग.स. कोरे यांनी केले आहे. --- अर्जासोबत परवानगीची प्रत आवश्यक इसापूर उजव्या कालव्याच्या वितरण व्यवस्थेद्वारे तसेच धरण जलाशय, अधिसूचित नदी-नाले आणि मुख्य कालव्यावरील मंजूर उपसा सिंचन योजनांद्वारे पाणी घेऊ इच्छिणाऱ्या लाभधारकांनी नमुना क्रमांक ७ व ७-अ मध्ये अर्ज भरून संबंधित शाखा कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. उपसा सिंचनाद्वारे पाणी घेणाऱ्यांनी अर्जासोबत संबंधित परवानगीची प्रत जोडावी. पिकांचे मागणी क्षेत्र २० गुंठ्याच्या पटीत असणे आणि थकीत पाणीपट्टी पूर्ण भरणे आवश्यक आहे. ----- नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई कालवा संचलन कार्यक्रमानुसारच सिंचनासाठी पाणी वापरणे बंधनकारक आहे. कालव्याचे पाणी शेतापर्यंत नेणाऱ्या शेतचाऱ्या स्वच्छ व सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी लाभधारकांची राहील. विनापरवानगी विद्युत मोटारी किंवा ट्रॅक्टरद्वारे पाणी उपसा करणे अथवा कालव्याचे गेट उघडणे यांसारख्या प्रकारांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenakshi Shinde Resign: माझ्या मनाला प्रचंड वेदना होतायत..., मीनाक्षी शिंदेंनी राजीनाम्याच्या पत्रात नेमकं काय लिहलंय?

School Books: सरकार बदललं अन् शालेय पाठ्यपुस्तकातील 'हे' शब्दही बदलले; पश्चिम बंगालमध्ये मुघल इतिहासाला कात्री

Israel Politics: बहुमत हुकलं तरी नेतान्याहू 'प्रचंड आशावादी'! थेट विरोधकांशीच आघाडीची तयारी

Ranji Trophy 2026: मुंबईने ६४ चेंडूंत जिंकली मॅच!Tanush Kotian च्या ८ विकेट्स, तर Musheer Khan ची ऐतिहासिक कामगिरी

Latest Marathi News Update: आदिवासी महिलेचे चोरी झालेले मंगळसूत्र मिळाले

SCROLL FOR NEXT